भालकेंचा पक्ष ठरेना आणि पंढरपूरच्या जागेचा सस्पेन्स सुटेना!

भालकेंचा पक्ष ठरेना आणि पंढरपूरच्या जागेचा सस्पेन्स सुटेना!

मंगळवेढा : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास उद्यापासून सुरवात होणार असली तरी पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान भारत भालके हे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार याचे गुपित अद्याप कळेनासे झाले आहे. त्यांच्या पक्षबदलाच्या या भूमिकेत सस्पन्स असल्यामुळे युतीत जागा निश्चित होईना. त्यामुळे सर्वच नेत्याचे कार्यकर्ते देखील शांततेत आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार भारत भालके, प्रशांत परिचारक, समाधान अवताडे यांच्यात तिरंगी लढत झाली होती. त्यात भालके हे विजयी झाले. यंदा ही निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यंदा सुधाकर परिचारक हे निवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्या संदर्भात त्यांच्या समर्थकांची बैठक झाली. परंतु सध्या भालके हे पक्ष बदलाच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यासाठी  ते वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा मतदारसंघांमध्ये आहेत.
दुसरीकडे पंढरपूरची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला असल्यामुळे शिवसेनेतून शैला गोडसे यांनी एकमेव मुलाखत दिली. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये किती युतीच्या वाट्यात ही जागा सेनेला असल्याचे सूतोवाच भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने केली असली तरी अंतिम निर्णय मात्र मुख्यमंत्र्याकडे ढकलला आहे.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर परिचारकांची उमेदवारी निश्चित ठरणार की अपक्ष लढणार हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे.  
सोलापूर जिल्ह्यातील कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे मात्र शांत आहेत. सध्या जिल्ह्यात काँग्रेसला उभारी देणाय्रा चेहऱ्याची गरज आहे. अन्यथा जिल्ह्यातील काँग्रेस संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com