पंढरपुरच्या दिलीप धोत्रेंवर मनसेची नवी जबाबदारी 

raj-thakre
raj-thakre

पंढरपूर : पंढरपूरचे मनसेचे सहकार परिषदेचे अध्यक्ष दिलीप धोत्रे यांच्यकडे सरचिटणीसपदाची नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. धोत्रेंच्या निवडीने मनसेने ग्रामीण चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे. 

विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कात टाकण्यास सुरवात केली आहे. शहरी तोंडवळा असलेल्या मनसेला आता ग्रामीण टच देण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेत संघटनात्मक पातळीवर फेरबदल केले जात आहेत. 

राज्यातील सत्तेची समीकरणे बदल्यानंतर गेली अनेक दिवस शांत असलेली मनसे आता अधिक आक्रमक होताना दिसत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेने पुन्हा रान उठवले आहे. 

शहरी आणि ग्रामीण भागात मनसेची ध्येयधोरणे पोचवण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संघटनात्मक पातळीवर अनेक फेर बदल नवीन पदाधिकार्याना संधी दिली आहे. 

धोत्रे यांनी मनसेच्या स्थापने पासून राज ठाकरेच्या सोबत कांद्याला खांदा लावून ग्रामीण भागात मनसे वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ठाकर यांनी दिलीप धोत्रे यांच्यावर सरचिटणीस पदाची महत्वाची जबाबदारी दिली आहे. 

जिल्हा संघटक म्हणून चमकदार कामगिरी केल्यानंतर सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाची ही जबाबदारी धोत्रेकडेच देण्यात आली होती. 

पक्षाने दिलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडू असे नुतन सरचिटणीस श्री.धोत्रेंवर यांनी सरकार नामाशी बोलतान सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com