मराठा समाजाला आरक्षण देण्याची पंढरपूरच्या नगराध्यक्षांची मागणी

मराठा आंदोलनाचा प्रारंभ पंढरपुरातून झाला असून पंढरपूर हे आरक्षण आंदोलनाचे केंद्र ठरले आहे. अशा परिस्थीतीत पंढरपूर शहराची प्रथम नागरीक व मराठा समाजाची एक घटक म्हणून आपण राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याची मागणी करणार असल्याचे पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांनी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण देण्याची पंढरपूरच्या नगराध्यक्षांची मागणी

पंढरपूर : मराठा आरक्षण प्रश्नी सरकार वेळकाढू धोरण अवलंबीत असल्याबद्दल मराठा समाजात संतापाची भावना असून राज्यभर आंदोलन चालू आहे. मराठा आंदोलनाचा प्रारंभ पंढरपुरातून झाला असून पंढरपूर हे आरक्षण आंदोलनाचे केंद्र ठरले आहे. अशा परिस्थीतीत पंढरपूर शहराची प्रथम नागरीक व मराठा समाजाची एक घटक म्हणून आपण राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव व   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याची मागणी करणार असल्याचे पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांनी सांगितले.

सध्या राज्यभर मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालु असून संतापलेल्या मराठा समाजाने अदयाप संयम बाळगला आहे. तरिही समाजातील काही युवकांच्या भावना संतप्त झाल्याने आत्महत्याही झालेल्या आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला या घटना लाजीरवाण्या आहेत. तसेच काही ठिकाणी हिंसक घटनाही घडत आहेत. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटना दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी मराठा आरक्षणासाठी घटना दुरुस्ती करणे साठी सहकार्य करणे आवश्यक आहे.

गेले काही दिवसापासून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन चालु असून हे आंदोलन शांततेत चालु आहे. या आंदोलनास सर्व समाजाने पाठींबा दिला असून त्यांचे आभार मानले पाहीजेत. मराठा समाज हा सर्व समाजाला बरोबर घेवून जाणारा समाज असून या समाजाचा प्रश्न व समस्या सर्व समाजाच्या आहेत. आज पर्यत समाजाने जसे शांततेत व संयमाने आंदोलन केले तशाच पध्दतीने उदया दिनांक 9 ऑगस्ट रोजी होणारे चक्का जाम आंदोलनही शांततेत पार पाडावे, एस टी बस वर दगडफेक अशा हिंसक घटना हावु नयेत याची दक्षता घ्यावी व समाजाची चांगली प्रतिमा कायम ठेवावी असे आवाहन नगराध्यक्षा साधना भोसले यांनी केले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com