pandharpur campaign | Sarkarnama

भालके, परिचारक आणि आवताडे यांच्यात तुल्यबळ लढत

हुकूम मुलाणी 
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

निवडणुकीची तोंडावर तालुका व गावपातळीवरील स्थानिक नेते सध्या मालामाल होत असल्याने मतदारातून तुमचं ठरलंय मग आमचं बी आता ठरवणार असा सूर निवडणुकीच्या तोंडावर गट बदलणाऱ्या स्थानिक नेत्यांना एक प्रकारे सावधानतेचा इशारा दिला आहे.

मंगळवेढा -  निवडणुकीची तोंडावर तालुका व गावपातळीवरील स्थानिक नेते सध्या मालामाल होत असल्याने मतदारातून तुमचं ठरलंय मग आमचं बी आता ठरवणार असा सूर निवडणुकीच्या तोंडावर गट बदलणाऱ्या स्थानिक नेत्यांना एक प्रकारे सावधानतेचा इशारा दिला आहे.

पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आ. भारत भालके यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. राष्ट्रवादी पक्षाचा आधार घेत राष्ट्रवादीचे नेते प्रचारासाठी मतदारसंघात आणले. वातावरण निर्मिती केली. तितक्याच ताकदीने सुधाकरपंत परिचारक यांच्या विजयासाठी प्रशांत परिचारक यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री 
रामदास आठवले, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, गोपीचंद पडळकर यांना आणले. 

परिचारकांची उमेदवारी रयत क्रांती पक्षाची जरी असली तरी उमेदवारी मुख्यमंत्र्यांनी दिली असे समजून भाजप पदाधिकारी कामाला लागले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी देखील वरिष्ठ पातळीवरील नेते मतदारसंघात मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती केली आहे. 

दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे अपक्ष असून ते सध्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बळावर सध्याच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्याकडे प्रभावी वक्ता नाही. त्यामुळे स्वतः स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे ते एक हाती प्रचार यंत्रणा राबवत आहेत. दिशाहीन युवक, बेरोजगारी, 25 वर्षे आश्वासनावर बोळवण हे पटवून देत आहेत. गावपातळीवरचे नेते आपल्याच गटांमध्ये असावे त्यासाठी पक्षीय नेत्यांनी मात्र कंबर कसली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख