पंढरपूर मंगळवेढ्यात घसरलेली टक्केवारी कुणाला तारणार कुणाला मारणार?

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भाजप, शिवसेना, रयत क्रांती महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन माजी पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात कंबर कसली. अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी देखील जोरात टक्कर दिली. परंतु, घसरलेल्या टक्केवारीचा कोणाला फटका बसणार याची चर्चा मात्र मतदारसंघात सुरू झाली
Pandharpur Mangalwedha - Sudhakar Paricharak - Bharat Bhalke - Samadhan Awatade
Pandharpur Mangalwedha - Sudhakar Paricharak - Bharat Bhalke - Samadhan Awatade

मंगळवेढा  : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भाजप, शिवसेना, रयत क्रांती महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन माजी पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात कंबर कसली. अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी देखील जोरात टक्कर दिली. परंतु, घसरलेल्या टक्केवारीचा कोणाला फटका बसणार याची चर्चा मात्र मतदारसंघात सुरू झाली 

विधानसभेच्या गत निवडणुकीत 2 लाख 29 हजार 492  इतके मतदान झाली मतदानाची टक्केवारी 75 टक्के राहिली.यंदा 2 लाख 37 हजार 625 इतके मतदान झाले. मताची 71.74 टक्केवारी राहिली गट निवडणुकीत काँग्रेसचे भारत भालके यांना 91863 इतके मतदान तर प्रशांत परिचारक यांना 82950 इतके मतदान तर शिवसेनेचे उमेदवार समाधान आवताडे यांना 40910 इतके मतदान झाले. या  निवडणुकीतील तिन्ही उमेदवार हे साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. प्रा. शिवाजी काळुंगे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी घेत या उमेदवारांना धक्का देण्याचा प्रयत्न केला. यंदा मतदानाचा टक्का घसरला आहे. मात्र, तो उमेदवारांसाठी चिंताजनक ठरू लागला आहे. 

मंगळवेढा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर पंढरपूरला जोडण्यात आला. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ 2009 आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे गेला माजी पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी दिली. त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2014 साली ही जागा राष्ट्रवादीला ताब्यात घेता आली नाही. काँग्रेस आमदार भालके यात विजयी झाले. परंतु, 2019 जागावाटपात ही जागा भालकेंच्या प्रवेशाने राष्ट्रवादीकडे राहिली आणि विरोधातील उमेदवार  हे राष्ट्रवादीचे माजी आमदार असलेले सुधाकरपंत परिचारक हे भारत भालके यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या दोघांसमोर अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी कडवे आव्हान उभे केले. त्यांचे शक्तीप्रदर्शन लक्षवेधक ठरले.

अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी कसल्याही परिस्थितीत सुधाकरपंत परिचारक यांना विजयी करण्यासाठी माजी पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व माजी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांना सांगितले असल्यामुळे ते दोघेही  उमेदवार नसताना त्यांच्यासाठी मात्र जिवाचे रान करीत असल्याचे दिसून आले  मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना अकलूज येथे बोलावून सुधाकरपंतासाठी काम करण्याच्या सूचना दिल्या. तर काही आ. भालके गटात गेलेल्यांना  परत आपल्या गटात बोलावून घेऊन प्रचारासाठी कामाला लावले. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी पंतासाठी जिवाचे रान केले. प्रचारात ते स्वतःचा उत्साह आवरू शकले नाहीत. 

विजयासाठी वरिष्ठ राजकीय नेत्याच्या सभा व आरोप-प्रत्यारोपांनी मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले असले तरी या मतदारसंघातील मूळ प्रश्न मात्र बाजूलाच राहिला गेला. पंतासाठी लावलेली ताकद,जनतेच्या भरवशावर असलेले भालके, तर नवोदित बेरोजगार युवकावर अवलंबून असलेले समाधान आवताडे यांच्यातील अतिशय चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता मात्र लागून राहिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com