महाराष्ट्रात पुन्हा भाजपाचाच मुख्यमंत्री : सरोज पांडे

महाराष्ट्रात पुन्हा भाजपाचाच मुख्यमंत्री :  सरोज पांडे

नगर : महाराष्ट्रात पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री होणार असून, राज्यातील विस्तारक, बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर बहुमताचा आकडा सहज पार होणे शक्‍य होणार आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर तसेच राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शक कारभारामुळे जगात एक नंबर असलेला पक्ष पुन्हा एकदा महाराष्ट्रात बहुमताने सत्तेत येऊन महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचाच होणार आहे,असे खासदार सरोज पांडे यांनी सांगितले. 

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या प्रभारी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या आढावा बैठका घेत आहेत. या बैठकीची राज्याची सुरुवात सर्वांधिक सदस्य नोंदणी झालेल्या नगर जिल्ह्यातून झाली. पांडे म्हणाल्या, की राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या विधानसभा मतदार संघनिहाय आढावा घेण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात नगरमधून होत आहे. 

12 विधानसभा मतदार संघातील विस्तारक, बुथप्रमुख, शक्तीकेंद्र विविध आघाडीचे प्रमुख जिल्हा पदाधिकारी यांनी प्रत्येकाने सात दिवस सदस्य नोंदणीसाठी देणे अपेक्षित आहे. ज्यांना हे काम जमणार नाही, त्यांच्या पदमुक्तीसाठी पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगून प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मागील निवडणुकीची स्थिती, लोकसभेची आकडेवारी व सद्य परिस्थिती यांचा आढावा घेत सर्वांना सक्रियपणे पक्षाचे काम करण्याच्या सूचना दिल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com