पंढरपूर, माळशिरस, दक्षिण, सांगोला, मोहोळ, मंगळवेढांत महिलाराज

जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांच्या सभापतिपदाची सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली. त्यामध्ये 11 पैकी सहा पंचायत समित्यांमध्ये महिलाराज असणार आहे. त्यामध्ये दक्षिण सोलापूर, सांगोला, मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस या पंचायत समित्यांचा समावेश आहे.
पंढरपूर, माळशिरस, दक्षिण, सांगोला, मोहोळ, मंगळवेढांत महिलाराज

सोलापूर : जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांच्या सभापतिपदाची सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली. त्यामध्ये 11 पैकी सहा पंचायत समित्यांमध्ये महिलाराज असणार आहे. त्यामध्ये दक्षिण सोलापूर, सांगोला, मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस या पंचायत समित्यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील 11 पैकी दोन पंचायत समित्यांचे आरक्षण हे अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले होते. तीन पंचायत समित्यांचे आरक्षण हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर सहा पंचायत समित्यांचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्‍चित केले होते. त्याची आरक्षण सोडत आज काढण्यात आली.

लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी आरक्षण काढण्यात आले. त्यामध्ये अक्कलकोट व माळशिरस या दोन पंचायत समित्या अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यानंतर दक्षिण सोलापूर, माढा व पंढरपूर या तीन पंचायत समित्यांचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी निश्‍चित झाले आहे.

बार्शी, करमाळा, सांगोला, मोहोळ, मंगळवेढा, उत्तर सोलापूर या सहा तालुक्‍यांचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्‍चित झाले आहे.

अक्कलकोट व माळशिरस या दोन्हीपैकी महिलासाठी आरक्षण करण्यासाठी पूर्वा सातपुते या पाच वर्षाच्या मुलीने चिठ्ठी काढली. त्यामध्ये माळशिरस पंचायत समितीचे सभापतिपद हे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित झाले.

नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये दक्षिण सोलापूर, पंढरपूर या दोन ठिकाणी महिलेला सभापतिपदाची संधी मिळाली आहे. सर्वसाधारणमध्ये सांगोला, मोहोळ, मंगळवेढा या तीन ठिकाणी पंचायत समितीच्या सभापतिपदी महिलांना संधी मिळाली आहे.

उत्तर सोलापूर, करमाळा, बार्शी चे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्‍चित झाले.

तालुकानिहाय पडलेले सभापतीपदाचे आरक्षण
बार्शी-सर्वसाधारण, दक्षिण सोलापूर-नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), करमाळा-सर्वसाधारण, माढा-नागरिकांचा मागास प्रवर्ग, सांगोला-सर्वसाधारण (महिला), मोहोळ-सर्वसाधारण (महिला), मंगळवेढा-सर्वसाधारण (महिला), उत्तर सोलापूर-सर्वसाधारण, पंढरपूर-नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), अक्कलकोट-अनुसूचित जाती, माळशिरस-अनुसूचित जाती (महिला)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com