Palghar : will Hitendra Thakur join hands with congress | Sarkarnama

पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर यांची बविआ काँग्रेस आघाडी सोबत जाणार का ? 

संदीप पंडित 
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

विरार  : हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला सोबत घ्यावे यासाठी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रयत्न केले जात आहेत . तर भाजपनेही ठाकूर यांच्याकडे चाचपणी चालवली आहे . पण हितेंद्र ठाकूर अजून आपली भूमिका उघड करायला तयार नसल्याचे दिसते . 

विरार  : हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला सोबत घ्यावे यासाठी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रयत्न केले जात आहेत . तर भाजपनेही ठाकूर यांच्याकडे चाचपणी चालवली आहे . पण हितेंद्र ठाकूर अजून आपली भूमिका उघड करायला तयार नसल्याचे दिसते . 

लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशा आघाड्या आणि युतीच्या चर्चा  रंगू लागल्या आहेत . पालघरवर साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पालघर जिल्ह्यात सद्या भाजपचा खासदार असला तरी या जिल्ह्यावर वर्चस्व असलेला पक्ष म्हणून बहुजन विकास आघाडी ( बविआ) कडे पाहिले जात आहे.  बविआला सोबत घेण्यासाठी साऱ्यांचा आटापिटा सुरू आहे . परंतु बविआ नेतृत्वाने मात्र मौन बाळगल्याने उत्सुकता मात्र ताणली गेली आहे. 

 पालघर लोकसभा मतदार संघांची निर्मिती झाल्यानंतर  पहिला खासदार निवडून आला तो स्थानिक पक्ष असलेल्या बविआचा . बळीराम जाधव हे निवडून आले होते . पण  2014 मध्ये मोदीलाटेत  भाजपच्या चिंतामण वनगा यांनी बळीराम जाधव यांचा पराभव केला.  दरम्यानच्या काळात वनगा यांचे निधन झाले .  कॉंग्रेचे राजेंद्र गावित यांनी भाजप मध्ये प्रवेश  घेतला . पालघरच्या  पोट निवडणुकीत बळीराम जाधव यांच्या पराभव करून पुन्हा एकदा भाजपचा झेंडा रोवला असला तरी वर्ष भरात पूल खालून बरेच पाणी वाहून गेले आहे. 

 बविताची या मतदार संघातील ताकद पाहून दोन्ही काँग्रेसची आघाडी बविआने आपल्या सोबत येण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुसऱ्या बाजूला युती ही बविआला आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे सद्या तरी बविआच्या पक्ष नेतृत्वाने याबाबत युती किंवा आघाडी करायची याबाबतचे आपले पत्ते उघडले नसून त्यांनी वेट ऍण्ड वाच ही भुमुक घेतली आऊन आपण योग्य वेळी आपली भूमिका स्पष्ट करू असे सांगितले आहे . 

आज बविआच्या ताब्यात वसई विरार महानगर पालिका आहे . जिल्हा  परिषदेतही बविआच्या  जास्त जागा आहेत .  जिल्ह्यातील वसई, नालासोपारा आणि बोईसर विधानसभेचे मतदार संघ असून या तीन मतदार संघात मतदारांची संख्या सर्वात जास्त असल्याने बविआला सर्वच पक्ष आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत . तसे प्रस्ताव ही पाठविले जात आहेत हे सर्व होत असताना बविआचे नेतृत्व मात्र मौन पाळून बसल्याने या निवडणुकीत बविआ कोणासोबत जाणार याबाबत उत्सुकता वाढली  आहे . 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख