पालघर, सिंदखेडराजा व लोणार नगरपरिषदेसाठी  मतदान 24 मार्चला 

आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे
votinng-evs-machine
votinng-evs-machine

मुंबई:  पालघर (जि. पालघर), सिंदखेडराजा आणि लोणार  (जि. बुलढाणा) या तीन नगरपरिषदेच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 मार्चरोजी मतदान होणार आहे .

त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली. 

सहारिया यांनी सांगितले की, पालघर, सिंदखेडराजा व लोणार या नगरपरिषदांच्यामुदती एप्रिल 2019 मध्ये संपत आहेत. या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 28 फेब्रुवारी ते 7 मार्च 2019 या कालावधीत नामनिर्देनपत्र स्वीकारली जातील. 

3 व 4 मार्च या शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देनपत्रांची छाननी 8 मार्चरोजी होईल.

मतदान 24 मार्च रोजी सकाळी7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत होईल. मतमोजणी 25 मार्चरोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com