पालघर नगरपालिकेची सभा सत्ताधारी शिवसेनेने का रद्द केली? 

पालघरमधील काही नगरसेवकांना विषयपत्रिका आणि टिप्पण्या न मिळाल्यामुळे नगराध्यक्षांनी शुक्रवारची विशेष सभाच रद्द केली. ही सभा मंगळवारी (ता. 14) होईल. सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक वेगवेगळी कारणे सांगून सभा रद्द करत असल्याने कालापव्यय होत आहे. विशेष सभा तहकूब करून पुन्हा अर्ध्या तासाने सुरू करता येते. प्रशासनाने या नियमाचे पालन करून विशेष सभा घ्यावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.
पालघर नगरपालिकेची सभा सत्ताधारी शिवसेनेने का रद्द केली? 

पालघर : पालघरमधील काही नगरसेवकांना विषयपत्रिका आणि टिप्पण्या न मिळाल्यामुळे नगराध्यक्षांनी शुक्रवारची विशेष सभाच रद्द केली. ही सभा मंगळवारी (ता. 14) होईल. सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक वेगवेगळी कारणे सांगून सभा रद्द करत असल्याने कालापव्यय होत आहे. विशेष सभा तहकूब करून पुन्हा अर्ध्या तासाने सुरू करता येते. प्रशासनाने या नियमाचे पालन करून विशेष सभा घ्यावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. 

पालघर नगरपालिकेने काही विषयांना मंजुरी मिळावी म्हणून शुक्रवारी (ता. 10) विशेष सभा ठेवली होती. विशेष सभा सकाळी 11 वाजता सुरू झाल्यानंतर गणसंख्या नसल्याने सभा रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक अतुल पाठक यांनी केली. 

"कोरम' नाही म्हणून विशेष सभा रद्द करू नका. "कोरम'अभावी तहकूब झालेली सभा अर्ध्या तासाने पुन्हा घेता येईल, असे नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी सांगितले; परंतु सभा रद्द झाल्याचे समजून पाठक निघून गेले. 

पाठक निघून गेल्याने सभा रद्द करावी, अशी मागणी सत्ताधारी नगरसेवकांनी केली. त्या वेळी सभा रद्द करण्यात येत असून ती मंगळवारी घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. 

सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक प्रत्येक वेळी काही ना काही कारणे सांगून सभा रद्द करायला भाग पाडतात. त्यामुळे नगरसेवकांचा वेळ वाया जातो. नगरपालिकेची कामेही होत नाहीत, अशी नाराजी कॉंग्रेसच्या उज्ज्वला काळे यांनी प्रकट केली. प्रशासनाने वेळच्या वेळी विषयपत्रिका आणि टिप्पण्या नगरसेवकांना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. 

प्रशासनाकडून वेळेवर सभेच्या सूचना आणि विषय पाठवले जातात; मात्र काही नगरसेवक स्वीकारत नसल्याचे आढळळे आहे, असे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com