जव्हार, डहाणू, वाडा जिंकण्यासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी 

महिनाभरात होणाऱ्या जव्हार, डहाणू नगरपालिका आणि वाडा नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा केला. या सर्व ठिकाणी शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी जव्हार येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले.
जव्हार, डहाणू, वाडा जिंकण्यासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी 

मोखाडा : महिनाभरात होणाऱ्या जव्हार, डहाणू नगरपालिका आणि वाडा नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा केला. या सर्व ठिकाणी शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी जव्हार येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले. 

जव्हार, डहाणू नगरपालिका आणि वाडा नगर पंचायत निवडणुका 13 डिसेंबरला होत आहेत. या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी करण्याच्या उद्देशाने शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांनी वसई, डहाणू, तलासरी, विक्रमगड, वाडा, जव्हार आणि मोखाडा तालुक्‍यांचा दौरा केला. 

जव्हार येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले. शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला सारून जव्हार नगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. उमेदवार निश्‍चित करण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आहेत; मात्र इच्छुकांनी तयारीला लागून प्रचार सुरू करावा, अशी सूचना त्यांनी केली. 

आमदार फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुका लढवल्या जातील, असे पक्षाचे जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांनी सांगितले. जव्हारचे माजी नगराध्यक्ष दिनेश भट यांनी शिवसेनेने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. नगरपालिकेवर भगवा फडकवून दाखवू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. 

या मेळाव्यात अनेक मुस्लिम युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार फाटक यांनी त्यांना शिवबंधन बांधले. या वेळी जिल्हा सह-संपर्कप्रमुख केतन पाटील, महिला आघाडी संघटक ज्योती ठाकरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे, गटनेते प्रकाश निकम, तालुकाप्रमुख सीताराम पागी, शहरप्रमुख चित्रांगण घोलप यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com