पालघरच्या  दारुण पराभवामुळे अशोक चव्हाण यांच्याविरोधात मोर्चेबांधणी  ?

पालघरात बहुजन विकास आघाडीशी काँग्रेसने युती का केली नाही आणि भंडारा गोंदियाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला का सोडली या दोन मुद्द्यांवर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना घेरण्याच्या हालचाली पक्षांतर्गत विरोधकांनी सुरु केल्या आहेत .
Ashok-chavan-Rahul-Gandhi.
Ashok-chavan-Rahul-Gandhi.

मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत थेट पाचव्या क्रमांक फेकले जाणे कॉंग्रेसच्या जिव्हारी लागले आहे.  हे निमित्त साधून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नियुक्‍तीवर नाराज असलेल्या गटाने   अशोक चव्हाण यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरु केली आहे . 

पालघरात बहुजन विकास आघाडीशी काँग्रेसने युती का केली नाही आणि भंडारा गोंदियाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला का सोडली या दोन मुद्द्यांवर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना घेरण्याच्या हालचाली पक्षांतर्गत विरोधकांनी सुरु केल्या आहेत . 

पालघर लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असता तर योग्य ठरले असते असे मत व्यक्‍त केले जाते आहे.बविआचे हितेंद्र ठाकूर यांनी आम्ही कॉंग्रेसच्या पाठिंब्याची प्रतीक्षा केली असे विधान केले आहे.बळीराम जाधव यांना एका निवडणुकीत कॉंग्रेसने पाठिंबा दिला होता आणि ते निवडूनही आले होते. भाजपप्रणित आघाडीत असलेल्या बविआला पाठिंबा देणे उत्तम ठरले असते, मात्र अशोक चव्हाण यांनी तसे केले नाही,त्यांच्यामुळेच राजेंद्र गावीत दूर गेले असे दिल्लीला कळवण्यात आले आहे. 

भंडारा गोंदियात बंड करणारे नानाभाउ पटोले कॉंग्रेसमध्ये प्रवेशले तरी ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला देणे योग्य नव्हते असेही या गटाचे मत आहे. भंडारा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे सोपवण्याचा निर्णय झाला तो योग्य नव्हता , ऐन निवडणुकीच्या वर्षात सहयोगी पक्षाला संधी न देता ती जागा कॉंग्रेसने लढणे गरजेचे होते असे एका गटाला वाटते.महाराष्ट्रात त्वरित नेतृत्वबदल करावा अशी मागणीही पुढे येते आहे.काही नाराज गट यासंदर्भात पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचे समजते.

महाराष्ट्राचे प्रभारी मोहनप्रकाश यांनी राज्य योग्य रितीने हाताळावे अशी मागणी समोर येत आहे . मोहनप्रकाश हे राहुल गांधी यांच्या प्रमुख सल्लागारातले एक आहेत. बिहारमध्ये त्यांच्या पुढाकाराने महागट बंधनाचा प्रयोग प्रत्यक्षात आला होता ,त्यामुळे त्यांच्याकडे महाराष्ट्रासारखे महत्वाचे राज्य सोपवण्यात आले आहे.मात्र या राज्यात कॉंग्रेसचे बरे सुरू नसल्याची तक्रार आहे. 

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेड महापालिका निवडणुकीत उत्तम यश मिळवले असले तरी ते फारसे प्रभावी नाहीत अशी विरोधी गटाची तक़्रार आहे. चव्हाण यांच्या ऐवजी पृथ्वीराज चव्हाण यांना संधी देण्यात यावी,देवेंद्र फडणवीस यांच्याशी सामना करण्याची क्षमता त्यांच्याच व्यक्‍तीमत्वात असल्याचे सांगितले जाते.मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर बहुतांश आमदार नाराज असल्याने त्यांना पुन्हा संधी दिली जाईल काय याबददल शंका आहे.

विदर्भात नाराज असलेल्या नेत्यांनी अशोकरावां विरोधात आघाडी उभारली आहे. मात्र या नाराजांचीच उचलबांगडी करण्याचे घाटत असल्याने अशोकरावांना कोणताही धोका नसल्याचे सांगितले जाते आहे. तसेच महाराष्ट्रात काँग्रेसकडे अशोक चव्हाण यांच्या इतका साम -दाम - दंड -भेद नीतीत 'सामर्थ्य'वान नेता नसल्याने त्यांचे स्थान मजबूत मानले जाते . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com