पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानच्या गोळीबाराला सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी या हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर दिले. कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमधील चकरा गावात सकाळी जवळपास ४.०० वाजता ही चकमक घडली
Pakistan Violates Ceasefire
Pakistan Violates Ceasefire

जम्मू  : पाकिस्तान सैन्याने लागोपाठ तिसऱ्या दिवशी भारतीय सीमावर्ती भागांना लक्ष्य करीत गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी सैन्याने शनिवारी जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील सीमेजवळच्या लष्कराच्या चौक्या आणि गावांवर निशाणा साधत गोळीबार केल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.

पाकिस्तानच्या गोळीबाराला सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी या हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर दिले. कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमधील चकरा गावात सकाळी जवळपास ४.०० वाजता ही चकमक घडली. जवळपास अडीच तास ही चकमक सुरू होती. या वेळी पाकिस्तानकडून मोर्टार हल्लादेखील केला गेला. या चकमकीत कुठलेही नुकसान झाले नसल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com