पाकिस्तानात 60 जागा महिलांसाठी, 10 जागा अल्पसंख्याकांसाठी राखीव

पाकिस्तानात 60 जागा महिलांसाठी, 10 जागा अल्पसंख्याकांसाठी राखीव

पाकिस्तानच्या जनरल असेंब्लीच्या 272 जागांसाठी आज (ता. 25 जुलै) मतदान होत आहे. मतदार दोन मते देतील, यातील एक असेल नॅशनल असेंब्लीसाठी आणि दुसरे प्रांतीय सभागृहासाठी. साठ जागा महिलांसाठी आणि 10 जागा अल्पसंख्याकांसाठी राखीव आहेत.

2017 मधील जनगणनेनुसार मतदारसंघांची फेररचना करण्यात आली. जागांची संख्या 272 ठेवूनच मतदारसंघांची फेररचना करताना 15 मतदारसंघ नव्याने निर्माण झाले. पाकमध्ये लोकसंख्येने मोठ्या असलेल्या पंजाब प्रांतातील जागा 148 वरून 141 वर आल्या. सिंध प्रांतातील जागा 61 आहेत तशाच राहिल्या. राजधानी इस्लामाबादमधील जागा एकने वाढून तीनवर पोहोचल्या. खैबर-पख्तुनख्वामधील जागा चारने, तर बलुचिस्तानमधील जागा दोनने वाढल्या. 

- एकूण जागा - 849 (नॅशनल असेंब्ली आणि चार प्रांतांच्या सभागृहांसाठी) 
- उमेदवार - 11,855 
- राजकीय पक्ष - 107 
- नॅशनल असेंब्लीच्या एकूण जागा - 342 (272 थेट निवड) 
- नॅशनल असेंब्लीसाठी उमेदवार - 3,459 (पंजाब - 1623, सिंध - 824,   खैबर-पख्तुनवा - 725, बलुचिस्तान - 287) 
- प्रांतनिहाय उमेदवार - पंजाब - उमेदवार - 4,036, जागा - 297, सिंध - उमेदवार - 2,2052, जागा - 130, खैबर-पख्तुनवा - उमेदवार - 1,165, जागा - 99, बलुचिस्तान - उमेदवार - 943, जागा - 51. 
- एकूण मतदार - 10,59,55,407 - महिला मतदार - 4,67,31,145 - पुरुष मतदार - 5,92,24,262 
- मतदान केंद्रे - 85,000 
- 2013 मध्ये झालेले मतदान - 55 टक्के 
- पाकिस्तानची लोकसंख्या - 21,27,42,631 
- एकूण देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी) - 278.913 अब्ज डॉलर (2016) 
- दरडोई उत्पन्न - 1,443.6 डॉलर 
- विकासदर - 5.5 टक्के 

----------- 

जाहीरनामे 

आरोग्यसुविधा, रोजगारनिर्मिती, गरिबांना दिलासा 

पाकिस्तान मुस्लिम लिग (एन) 

आरोग्यावर विशेष लक्ष 
- पंतप्रधान राष्ट्रीय आरोग्य योजनेचा विस्तार करणार. कुपोषण रोखण्यावर पहिले हजार दिवस खर्च करणार. आरोग्यावरील वार्षिक खर्च 20 टक्के वाढवणार. 250 स्टेडियम, 50 ऍस्ट्रोटर्फ आणि क्रीडा अकादमी स्थापणार. पाकिस्तानच्या उत्तर आणि किनारपट्टीच्या भागात पर्यटनाला चालना देणार, त्यासाठी सुविधा विकसित करणार. जागतिक दर्जाची रेल्वे प्रणाली साकारणार. दोन लाखांसाठी रोजगार निर्माण करणार. 
---------- 

पाकिस्तान पीपल्स पार्टी 

गरिबांना घर, शेतकऱ्यांना सबसिडी 
- मूलभूत आरोग्यविषयक सुविधा देणार. माता आणि मूल यांना पूरक आरोग्य कार्यक्रम, फॅमिली हेल्थ कार्ड मोफत देणार. स्वच्छ पेयजल, भूक मिटावो कार्यक्रम राबविणार. अनधिकृत बांधकामांना रीतसर करण्यासाठी अपना घर, अपनी गली योजना राबवणार. शेतकऱ्यांना सबसिडीसाठी बेनझीर किसान कार्ड योजना राबवणार. 2025 पर्यंत शिक्षणावरील खर्च एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या पाच टक्के करणार. हवामान बदलातून निर्माण होणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी राष्ट्रीय कृती कार्यक्रम ठरवणार. 

------------ 

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ 

एक कोटी रोजगारनिर्मिती 
पाकिस्तानला इस्लामिक कल्याणकारी देश करणार. पाच वर्षांत एक कोटी लोकांना रोजगार देणार, पाच वर्षांत पन्नास लाख अल्पकिमतीच्या घरांची उभारणी करणार, दक्षिण पंजाबमध्ये स्वतंत्र प्रांताची निर्मिती करणार. परदेशस्थ पाकिस्तानींना मतदानाचा हक्क देणार. तुरुंगातील पायाभूत सुविधांचा विस्तार करणार. अर्थकारणाला चालना देण्यासाठी राजकीय-आर्थिक राजनैतिक यंत्रणा राबवणार. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com