पैठण शिवसेनेत आमदार संदीपान भुमरेंना स्पर्धक नाही?

.
sandipan_bhumre
sandipan_bhumre

औरंगाबादः पैठण  विधानसभा मतदारसंघात  पाचव्यांदा शिवसेनेतर्फे संदीपान भुमरे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची दाट शक्‍यता आहे.   त्यांना पक्षातंर्गत स्पर्धकच नसल्यामुळे भुमरे याचा मार्ग मोकळा असल्याचे बोलले जाते.

पैठण विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा मजबुत गड म्हणून ओळखला जातो. शिवसेनेचे विद्यमान आमदार संदीपान भुमरे यांनी या मतदारसंघातू चारवेळा विजय मिळवला आहे. 95 ते 2004 अशी हॅट्रीक साधत भुमरे यांनी आपले नाणे खणखणीत असल्याचे सिध्द केले होते. 2009 मध्ये मात्र त्यांना राष्ट्रवादीकडून धक्कादायक पराभव पचवावा लागला होता. राष्ट्रवादीचे संजय वाघचौरे यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवून दाखवला होता . 

पण २०१४ च्या  निवडणुकीत  संदीपान भुमरे यांनी भाजपशी  युती नसतांना पैठण मतदारसंघ शिवसेनेकडे खेचून आणला. मराठवाड्यातील शिवसेना इच्छुकांच्या मुलाखती 15 व 16 सप्टेबंर रोजी दोन टप्यात मुंबईत होणार आहेत.  यावेळी शिवसेनेतर्फे इच्छुक म्हणून  नावे येतात याबाबत उत्सुकता आहे . 

पैठण विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर सध्या तरी संदीपान भुमरे यांच्या शिवाय अन्य पर्याय पक्षापुढे दिसत नाही. त्यामुळे भुमरे यांना उमेदवारी मिळण्यात कुठलीच अडचण दिसत नाही. लोकसभा निवडणुकीपुर्वीचे राज्यातील राजकीय वातावरण आणि युतीमधील बेबनाव पाहता विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढतील अशी जोरदार चर्चा होती.

त्यामुळे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले होते. जालना लोकसभा मतदारसंघात पैठण विधानसभा येत असल्याने सध्याचे केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी डझनभर इच्छूक पक्षात तयार केले होते. शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले दत्ता गोर्डे यांच्यासह अनेकांना विधानसभेच्या उमेदवारीचे आश्‍वासन देत दानवे यांनी पक्षात घेतले होते. याचा फायदा दानवे यांना लोकसभा निवडणुकीत भरघोत मतदानाच्या रुपात झाला.

पण त्यानंतर राज्यात पुन्हा युतीचे वारे वाहू लागेल आणि आता विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती  होईल असे  मानले  जात आहे. त्यामुळे उमेदवारीच्या आशेवर भाजपमध्ये गेलेल्या अनेकांचा स्वप्न भंग झाला आहे. तालुक्‍यातील शरद सहकारी कारखाना ताब्यात घेत भुमरे यांनी सहकार क्षेत्रात देखील उडी घेतल्याने शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांचे गळीत हंगाम कार्यक्रमाच्या वेळी  कौतुक केले होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com