Padharpur Wari on Cycle | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

भाजपचे सरचिटणीस लक्ष्मण सावजींनी केली सायकलवर पंढरीची वारी 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 22 जुलै 2018

सहाय्यक आयुक्त हरिष बैजल आणि त्यांच्या सहकाऱ्यांची नाशिक सायकलिस्ट एसोसिएशनची नाशिक ते पंढरपूर सायकलची वारी झाली. यंदा पाचशे सायकलपटुंनी नाशिक ते पंढरपूर वारी केली. सोमवारी 13 जुलैला निघून नगर आणि टेंभुर्णी असे दोन मुक्काम करुन 360 किलोमीटरची वारी यशस्वीरित्या पूर्ण केली.

नाशिक : आषाढी एकादशीची पंढरपुरची वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा आहे. वारकरी, शेतकरी, व्यापारी, महिला, विद्यार्थी, कार्यकर्ते असे सगळेच वारीत योगदान देत असतात. गेल्या सात वर्षांपासून नाशिकचा सायकल क्‍लबही वारीत सहभाग होत आहे. यंदा त्यात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, नगरसेवक संतोष गायकवाड यांसह विविध राजकीय नेते सहभागी झाले होते. 

सहाय्यक आयुक्त हरिष बैजल आणि त्यांच्या सहकाऱ्यांची नाशिक सायकलिस्ट एसोसिएशनची नाशिक ते पंढरपूर सायकलची वारी झाली. यंदा पाचशे सायकलपटुंनी नाशिक ते पंढरपूर वारी केली. सोमवारी 13 जुलैला निघून नगर आणि टेंभुर्णी असे दोन मुक्काम करुन 360 किलोमीटरची वारी यशस्वीरित्या पूर्ण केली. यामध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र नखाते यांसह विविध अधिकारी. डॉक्‍टर्स, शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. श्री. गुरुजी रुग्णालयाच्या सात डॉक्‍टरांसह अनेक महिलांचा यात लक्षणीय सहभाग होता. राजकीय क्षेत्रात सक्रीय असलेले भाजपचे प्रदेश सरचिटणीस त्यात पहिल्यांदाच सहभागी झाले. त्यांनी वर्षभर त्याचा सराव केला होता. नांदुर शिंगोटे येथे त्यांची सायकल पंक्‍चर झाली. त्यामुळे त्यांना सायकल गाडीने पुढे न्यावी लागली. नगरच्या मुक्कामानंतरही पंक्‍चर झाली होती. पण त्यावर मात करुन त्यांनी वारी पूर्ण केली. 

डॉ. हरीष बैजल यांनी त्याचे उत्तम संयोजन केले. संयोजनामध्ये प्रवीण खाबिया, नंदू देसाई, नाना फड, डॉ. खैरे यांनी त्याचे आयोजन केले. त्यात रुग्णवाहिका. प्रत्येक पंचवीस किलोमीटरवर अल्पोपहार, वैद्यकीय पथक, मुक्कामाची व्यवस्था त्यात होती. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीत नाशिक सायकलिस्ट असोसिएशनची वारी चर्चेत राहिली. 

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख