गोपीचंद पडळकरांचा वंचितला रामराम, दोन दिवसात पुढचा निर्णय

  गोपीचंद पडळकरांचा वंचितला रामराम, दोन दिवसात पुढचा निर्णय

पुणे : वंचित बहुजन विकास आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक दोन दिवसात आपल्या राजकीय वाटचालीबाबत आपण निर्णय घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले. " धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत आणि माझ्या समाजाचा मी भाजप बरोबर जावे यासाठी मोठा दबाब असल्याचे' त्यांनी सांगितले पडळकर यांनी आत्ता थेट कुठलेही विधान केलेले नसले तरी ते आता पुन्हा भाजपमध्ये परतणार असल्याचे ेसंकेतच त्यांनी दिले आहेत. 

वंचितचे काम थांबवण्याचा त्यांचा हा निर्णय आघाडीला धक्कादायक आहे. कारण पडळकरांना महासचिव केल्याच्या रागातूनच लक्ष्मण माने यांनी वंचितमधून बाहेर पडून नव्या आघाडीची स्थापना केली आहे. आता पडळकर जर आघाडीतून बाहेर पडून पुन्हा भाजपमध्ये जात असतील तर माने कोणती भूमिका घेणार अशा प्रश्‍न आहे. त्याचबरोबर भाजपमधील सांगलीचे कार्यकर्ते पडळकरांना स्वीकारणार का हा देखील मोठा प्रश्‍न आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com