चार बलात्काऱ्यांना यमसदनी पाठविणारे IPS पी. व्ही. सज्जनार

..
p. v. sajjanar, ips
p. v. sajjanar, ips

सायबराबाद : सायबराबादचे पोलिस आयुक्त पी. व्ही. सज्जनार पुन्हा चर्चेत आले आहेत.  हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलिसांबरोबरील चकमकीत मारले गेले.  अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली व पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी गोळीबार केला.

या घटनेत चारही आरोपी ठार झाले. त्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली. काहींनी पोलिसांच्या या कृतीबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. काहींनी या चकमकीच्या खरेपणाबद्दल शंका घेत पोलिसांनीच कायदा हातात घेतल्याबद्दल टीका केली.

सज्जनार हे 2008 मध्ये वारंगळ जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक असताना त्यांच्या काळात तरुणीवर अॅसिड फेकण्याचे प्रकरण गाजले होते. त्या गुन्ह्यातील तीन आरोपीही त्यांनी पोलिस चकमकीत ठार केले होते. 

आजची घटना राष्ट्रीय महामार्ग ४४ जवळ घडली. घटनास्थळी क्राईम सीन रिक्रिएट करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यावेळी आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला आणि त्यावेळी घटनास्थळावरून जाण्याचा प्रयत्न केला यानंतर पोलिसांकडून त्यांच्यावर गोळीबार केला.

तेलंगणची राजधानी असलेल्या हैदराबाद येथे महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर हत्या आणि नंतर मृतदेह जाळण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणातील चार जणांना अटक करण्यात आली होती.

याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. आरोपींची चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघड झाले होते. पीडित तरुणीचा आवाज कोणालाही ऐकायला जाऊ नये यासाठी आरोपींनी गुन्हा करत असताना तिचं तोंड दाबून ठेवलं होतं. श्वास घेऊ न शकल्यामुळेच गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाला. पीडित तरुणीला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आरोपींनीच कट रचत तिच्या स्कुटीमधून हवा काढली होती, अशीही माहिती पोलिस तपासाच पुढे आली होती.

चारही आरोपींनी पीडित तरुणी टोल प्लाजावर स्कुटी उभी करत असल्याचं पाहिलं होतं. यानंतर आरोपींनी सामूहिक बलात्काराचा कट रचला. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी आपली स्कुटी घेण्यासाठी परतली असता पंक्चर झालं असल्याचं तिने पाहिलं. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपींनीच तरुणीच्या स्कुटीमधील हवा काढली होती. दुचाकी पंक्चर झाल्यामुळे तिला काळजी वाटत होती.  यावेळी एक आरोपी मदत करण्याचा बहाणा करत तिथे पोहोचला. त्याचा हेल्पर स्कुटी दुरुस्त करुन देतो सांगत त्याने तिला दूर नेले होते. 

यानंतर पीडित तरुणीवर जबरदस्ती करत निर्जनस्थळी नेण्यात आलं. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता.
सामूहिक बलात्कारावेळी पीडित तरुणीने मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली होती. आरोपींना यामुळे आपण पकडले जाऊ अशी भीती वाटू लागली होती. याचवेळी एका आरोपीने आवाज कोणालाही ऐकू जाऊ नये यासाठी पीडित तरुणीचं तोंड दाबून ठेवलं. यावेळी श्वास घेऊ न शकल्याने गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाला.

हैदराबादच्या पीडितेला लवकर न्याय मिळाला याचा आनंद झाला. तसेच आरोपींचा एन्काऊंटर केल्याबद्दल पोलिसांचे खूप खूप धन्यवाद, असे निर्भयाच्या आई आशादेवी यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com