पी. एन. पाटील यांनी महाडिकांचे टेन्शन दूर केले...

....
p n patil-mahadeo mahadik
p n patil-mahadeo mahadik

कोल्हापूर : ऐन निवडणुकीच्या तोंडावरच "गोकुळ'चे ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष विश्‍वास पाटील व सत्तारूढ गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात निर्माण झालेले मतभेद दूर झाले. संघाचे दुसरे नेते आमदार पी. एन. पाटील यांच्या मध्यस्थीनंतर श्री.पाटील यांनी नाराजी दूर झाली, 

संघाच्या ताराबाई पार्कातील कार्यालयात या दोन नेत्यांच्या बैठकीत यावर पडदा टाकला. दरम्यान, सत्तारूढ गटाकडे तब्बल 2275 ठराव संकलित झाल्याची माहिती आहे. दोन नेत्यांच्या काल झालेल्या बैठकीतच ठरावांचा तालुकानिहाय आढावा घेतला. सोमवारी शक्तिप्रदर्शनाद्वारे ठराव सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे सादर केले जाणार आहेत.

"गोकुळ'च्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरून विश्‍वास पाटील व श्री. महाडिक यांच्यात विसंवाद निर्माण झाला होता. त्यातून श्री. महाडिक यांच्या उपस्थितीत झालेल्या एकाही बैठकीला श्री. पाटील यांनी हजेरी लावली होती. ही नाराजी दूर करण्यासाठी श्री. महाडिक यांनी श्री. पाटील यांची त्यांच्या शिरोली दुमाला येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर श्री. पाटील हे सत्तारूढ गटापासून चार हात लांबच होते. त्याच दरम्यान संघाचे दुसरे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनीही निवृत्तीची घोषणा केली.

या दोन दिग्गज संचालकांच्या भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांसमोर चांगलीच अडचण निर्माण झाली होती.
या पार्श्‍वभूमीवर संघाच्या ताराबाई पार्कातील कार्यालयात पी. एन.-महाडिक यांच्यात बैठक झाली. या बैठकीला विश्‍वास पाटील हेही उपस्थित होते, त्याच बैठकीत श्री. महाडिक व श्री. पाटील यांच्यात निर्माण झालेले गैरसमज दूर केले. यात पी. एन. यांची मध्यस्थाची भूमिका महत्त्वाची ठरली. याच बैठकीत तालुकानिहाय संचालकांकडे गोळा झालेल्या ठरावांचा आढावा घेण्यात आला. त्यात सत्तारूढ गटाकडे 2275 ठराव दाखल झाल्याचे समजते.

3485 ठरावांची प्रतिक्षाच
"गोकुळ'च्या निवडणुकीसाठी ठराव दाखल करण्यास चार दिवसांचा अवधी असताना अजूनही 3400 संस्थांच्या ठरावांची प्रतिक्षाच आहे. आज 18 तर आजअखेर 174 संस्थांचे ठराव सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे दाखल झाले. संघाने 3659 प्राथमिक दूध संस्था सभासदांची यादी या कार्यालयाकडे सादर केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com