शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस सरकारला पाठिंबा देणार नाही!

शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस सरकारला पाठिंबा देणार नाही!

हैदराबाद : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष एकत्र येण्याच्या प्रयत्नांची 'एमआयएम'चे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी खिल्ली उडविली. 

या प्रयत्नांबाबत आणि 'राष्ट्रवादी'चा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले असता, "आधी त्यांचा निकाह होऊ दे, मग बघू मुलगा होणार की मुलगी. अजून तर निकाह झालाच नाही,' अशी प्रतिक्रिया ओवेसी यांनी दिली. भाजप आणि शिवसेना हे 'राम और श्‍याम'सारखे आहेत, त्यांची विचारसरणी सारखी आहे. आम्ही शिवसेना आणि भाजपचा समावेश असलेल्या सरकारला कधीही पाठिंबा देणार नाही, असे ओवेसी यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com