Owaisi says killer of Mahatma Gandhi is terrorist | Sarkarnama

ओवैसी म्हणतात राष्ट्रपित्याची हत्या करणारा अतिरेकीच 

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मे 2019

महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्याला अतिरेकीच म्हणावे लागेल . अससोद्दीन ओवैसी

हैद्राबाद : एमआयएमचे नेते अससोद्दीन ओवैसी यांनी कमल हसन यांना पाठिंबा देणारे वक्तव्य केले आहे . प्रख्यात चित्रपट अभिनेते कमल हसन यांनी महात्मा गांधी यांची  हत्या करणारा नथुराम गोडसे हा पहिला हिंदू अतिरेकी होता  असे विधान सोमवारी  करून खळबळ उडवून दिली होती . 

भाजपच्या नेत्यांनी कमल हसन यांच्याविरुद्ध टीकेचा गदारोळ उठवला होता . या पार्श्वभूमीवर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेकडे पाहिले जात आहे . 

यासंदर्भात बोलताना अससोद्दीन ओवैसी म्हणाले, " महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्याला अतिरेकीच म्हणावे लागेल . राष्ट्रपित्याची हत्या करणाऱ्याला दुसरे काय म्हणणार? महात्मा गांधी यांच्या हत्येत सहभागी असणारे सर्वच अतिरेकी होते . त्यांच्या हत्येची कपूर कमिशन मार्फत चौकशी झाली होती . चौकशीत दोषी निष्पन्न झालेले सर्व अतिरेकीच होते . "

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख