ओवेसी-आंबेडकरांची पुण्यात अडीच तास चर्चा : इम्तियाज जलील 

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे सर्वेसर्वा बॅ. खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपा संदर्भात पुण्यात आज बैठक पार पडली.
Owaisi_Ambedkar
Owaisi_Ambedkar

औरंगाबादः वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे सर्वेसर्वा बॅ. खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपा संदर्भात पुण्यात आज बैठक पार पडली. दोन अडीच तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली, परंतु अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारनामाशी बोलतांना दिली. 

गेल्या अनेक दिवसांपासून आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून एमआयएम-वंचित आघाडीमध्ये ताणाताणी सुरू होती. एमआयएम वंचित आघाडीतून बाहेर पडणार अशा चर्चांना देखील उधाण आले होते. पंरतु ही आघाडी टिकावी यासाठी ओवेसी आणि आंबेडकर या दोन्ही प्रमुख नेत्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. 

प्रकाश आंबेडकर यांनी देखील एमआयएम वंचित आघाडीतून बाहेर पडणार या वृत्ताचे खंडन करत येत्या 26 ऑगस्टला आम्ही हैदराबादेत जागा वाटप जाहीर करू असे प्रसारमाध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले होते. त्यानंतर असदुद्दीन यांचे पत्र असलेला बंद लिफाफा घेऊन औरंगाबादेतून एमआयएमचे नेते डॉ. गफ्फार कादरी मुंबईत ऍड. प्रकाश आंबेडकरांना भेटले देखील होते. 

त्यानूसार आज हैदराबाद ऐवजी पुण्यात असदुद्दीन ओवेसी आणि ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक झाली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे प्रस्ताव आणि कुठल्या जागा लढवयाच्या, कुणी लढवायच्या यावर चर्चा केली. पंरतु अंतिम जागा वाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही असे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाढत असलेली चलबिचल पाहता ही बैठक होणे महत्वाचे होते. 

असदुद्दीन ओवेसी हे दिल्लीत असल्यामुळे त्यांनी मी पुण्यात येतो असा निरोप दिला होता. त्यानूसार बैठक हैदराबाद ऐवजी पुण्यात झाल्याचेही इम्तियाज यांनी सांगितले. बैठकीत काय चर्चा झाली याची कुठलीही माहिती आपल्याला नाही, बैठकीत आपण नव्हतो, दोन प्रमुख नेत्यांमध्येच ती झाली. त्यामुळे त्याचा तपशील आपल्याकडे नसल्याचेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com