Owaisi in action at Parbhani | Sarkarnama

ओवैसी यांनी स्टेजवरच केली पंतग उडविण्याची ऍक्शन 

गणेश पांडे 
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

..

परभणी :  'एमआयएम'चे प्रमुख असुद्दीन ओवैसी  हे भाषण करण्यात तरबेज. अस्सल हैदराबादी लकबीतील त्यांचे भाषण म्हणजे श्रोत्यासाठी कर्णसुखच म्हणावे लागेल. परंतू ओवीसी यांचा नवीनच चेहरा बुधवारी समोर आला.

परभणीत निवडणुकीची सभा झाल्यानंतर ओवैसी यांनी चक्क व्यासपीठावरून पतंग उडविण्याची स्टाईल करून उपस्थित श्रोत्यांच्या टाळ्या मिळविल्या.

परभणीतील एमआयएमचे उमेदवार अली खान यांच्या प्रचार सभेसाठी ओवैसी  बुधवारी (दि.9) परभणीत आले होते. दर्गा रोड परिसरातील मैदानात त्यांची सभा झाली. नेहमी प्रमाणे त्यांनी भाषणाला सुरुवात झाली.

35 मिनिटे भाषण केल्यानंतर ओवीसी यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार झाल्यानंतर ओवैसी  यांनी चक्क व्यासपीठावरूनच पंतग निशाणी असल्याचे सांगण्यासाठी पतंग उडविण्याची नक्कल करून दाखविली. यामुळे सभास्थळी टाळ्याचा कडकडाट झाला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख