रामदेव बाबांमुळे मोदींही मतदानापासून दूर राहतील - ओवेसी

 रामदेव बाबांमुळे मोदींही मतदानापासून दूर राहतील - ओवेसी

हैदराबाद : ""घटनाबाह्य गोष्टींवर बोलण्यास कोणालाही कायद्याने प्रतिबंध करता येत नाही, पण रामदेव बाबा यांच्या अशा कल्पनांना नाहक महत्त्व का दिले जाते?, असा प्रश्‍न " मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन ' (एमएआयएम) या पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ट्‌विटवर सोमवारी केला आहे. 
रामदेव बाबा त्यांच्या पोटाशीसंबंधित काहीही करू शकतात. पायांची हालचाल कशीही करू शकतात. पण, याचा अर्थ असा नव्हे, की नरेंद्र मोदी हे तिसरे अपत्य आहे म्हणून ते त्यांचा मतदानाचा हक्क बजावू शकत नाहीत, असेही ओवेसी यांनी म्हटले आहे. 

योगगुरू बाबा रामदेव यांनी हरिद्वार येथे काल पत्रकार परिषदेत बोलताना "वाढत्या लोकसंख्येच्या प्रश्‍नावर उपाय शोधण्यासाठी भारत तयार नाही,' असे सांगत काही उपाय सुचविले होते. यात तिसऱ्या अपत्याला मतदानाचा अधिकार देऊ नये. तसेच, सरकारी नोकरीपासून दूर ठेवावे, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. देशाची लोकसंख्या 150 कोटींच्या जास्त होण्यास रोखले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले होते. त्यावर ओवेसी यांनी सोमवारी त्यांच्यावर टीका केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com