ovesi | Sarkarnama

भाजप उद्योगपतींची घरे भरतोय - ओवेसी

संपत देवगिरे
गुरुवार, 4 मे 2017

नाशिक : भारतीय जनता पक्षाने "सबका साथ, सबका विकास' अशी घोषणा करून सत्ता मिळवली. मात्र सत्तेत येताच ते सबका साथ, अपना विकास हे धोरण सुरू केले आहे. केंद्रातील सत्तेचा वापर केवळ मोजक्‍या उद्योगपतींची घरे भरण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे जनतेने लवकर शहाणे व्हावे अन्यथा फार उशीर होईल. अशी टीका "एमआयएम"चे नेते खासदार असोउद्दीन ओवेसी यांनी केली. 

नाशिक : भारतीय जनता पक्षाने "सबका साथ, सबका विकास' अशी घोषणा करून सत्ता मिळवली. मात्र सत्तेत येताच ते सबका साथ, अपना विकास हे धोरण सुरू केले आहे. केंद्रातील सत्तेचा वापर केवळ मोजक्‍या उद्योगपतींची घरे भरण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे जनतेने लवकर शहाणे व्हावे अन्यथा फार उशीर होईल. अशी टीका "एमआयएम"चे नेते खासदार असोउद्दीन ओवेसी यांनी केली. 

मालेगाव महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. शहराच्या खैबाब चौकात झालेल्या ओवेसी यांची सभा झाली. ते म्हणाले, मालेगावच्या स्फोटाच्या तपासावर सरकार दबाव टाकते आहे. त्यामुळे हेमंत करकरे यांनी कष्टाने केलेल्या तपासावर पाणी फिरवून साध्वी प्रज्ञासिंहला जामीन मिळेल अशी मदत पडद्यामागून झाली. भाजपचे सरकार सध्या केवळ स्वतःच्या विकासात व्यस्त आहेत.

कॉंग्रेसने रिलायन्सला 75 भूखंड नाममात्र दराने दिली. भाजप आता या उद्योगपतींची घरे भरण्यात व्यस्त झाला आहे. सामान्य नागरिकांची त्यांना काहीही चिंता नाही. त्यामुळे मुस्लीम समाजाने संघटित रहावे. एकोप्याने वागावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अफगाणिस्तान दौ-यावर असताना त्यांना पाकिस्तानचे निमंत्रण कोणीही दिले नव्हते तरी ते गेले. नवाझ शरीफ यांचा पाहुणचार घेतला. मात्र आम्ही पिढ्या न्‌ पिढ्या या देशात राहतो आहोत. आम्ही बीफ खाल्ले तर आम्हाला पाकिस्तानात जा असे धमकावले जाते. हे अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. 

गेली काही वर्षे सातत्याने अल्पसंख्याक मतांमध्ये विभागणी करून कॉंग्रेसची अडचण करणा-या "एमआयएम"ला मालेगाव शहरातही मोठा चमत्कार करू अशी स्वप्न पडू लागली आहेत. येथेही त्यांच्याकडे सर्व प्रभागांत उमेदवार नाहीत. मात्र त्यासाठी वातावरण तयार करण्यावर त्यांनी सध्या भर दिला आहे. कॉंग्रेसने पंच्चावन्न उमेदवार जाहीर करून निवडणुकीच्या मैदानात आघाडी घेतली आहे.

आज माजी आमदार रशीद शेख, माजी महापौर साजेदा शेख यांसह माजी महापौर साजेदा शेख यांसह महत्त्वाच्या नेत्यांनी अर्ज दाखल केले. शेवटचे दोन दिवस राहिल्याने सर्वच राजकीय पक्ष उमेदवार, प्रचाराची रणनीती आणि कार्यकर्ते जमवा जमव करण्यात व्यस्त आहे. मात्र "एमआयएम"ने आतापर्यंत दोन सभा घेऊन वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. बेधडक विधाने, बेछूट आरोप यामुळे त्यांच्या सभेला गर्दीही होत असल्याने सर्वाधिक जागा जिंकू असा विश्वास खासदार ओवेसी यांना वाटू लागला आहे. त्यांचा हा विश्‍वास मालेगावच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख