ovesi | Sarkarnama

गोरक्षकांना मोक्का लावा- ओवेसी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 एप्रिल 2017

लातूर : देशभरात गेल्या काही दिवसांत गोरक्षकांनी 9 मुस्लिमांची हत्या केली. ते मुस्लिम असले तरी भारतीय होते. पंतप्रधान मोदी ताकदवान नेते आहेत, त्यांनी गोरक्षकांना मोक्का लावावा, दहा वर्ष तुरुंगांत डांबावे अशी मागणी खासदार असुद्दोदीन ओवेसी यांनी लातूरच्या जाहीर सभेत केली. 
महापालिकेच्या निवडणूक प्रचार सभेत ओवेसी काय बोलतात याकडे सगळ्याचे लक्ष लागले होते. स्थानिक विषय कॉंग्रेस व भाजपवर ते जोरदार टीका करतील अशी अपेक्षा होती. पण हिंदूराष्ट्र, गोरक्षक व कुलभूषण जाधव या राष्ट्रीय विषयावरच ओवेसींनी जोर दिल्याने सभा फसल्याची चर्चा लातुरात होती. 

गोहत्याबंदी कायद्याची मागणी व त्यावरून देशभरात मुस्लिमांच्या हत्या व त्यांना होणाऱ्या मारहाणीच्या मुद्याला सुरुवातीलाच ओवेसी यांनी हात 
घातला. पाकिस्तानी न्यायालयाने गुप्तहेर ठरवून फाशीची शिक्षा सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी सरकारने आकाश-पाताळ एक करावे असे आवाहन करतांनाच हिंदूराष्ट्राला विरोध करण्यासाठी दलित, मुस्लीम, धनगर समाजाने एकत्र यावे असे आवाहन देखील ओवेसी यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदूराष्ट्र झाल्यास ती एक आपत्ती ठरेल असा इशारा दिला होता याची आठवण करुन देतांनाच भारताची वाटचाल हिंदूराष्ट्राकडे सुरु असल्याचे सांगितले. 
सतरा को फिर आऊंगा 
"आज बहोत कुछ बोलना बाकी रहे गया है, लेकीन मै सतरा तारीख को फिर आऊंगा' असे म्हणत सभेसाठी जमलेल्या गर्दीला पुढच्या वेळी कॉंग्रेस, भाजपची खरडपट्टी काढणार असल्याचे अधोरेखित केले. महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वी व जिल्ह्यातील एमआयएममध्ये फूट पडली तेव्हा ओवेसी यांची लातूरात सभा झाली होती. त्यावेळी आप देशमुख है, तो हम भी ओवेसी है म्हणत त्यांना कॉंग्रेसला आव्हान देण्याची भाषा केली होती. बुधवारी झालेल्या सभेत ओवेसींनी कॉंग्रेस बद्दल ब्र शब्दही न काढल्याने एमआयएम मॅनेज झाल्याची जोरदार चर्चा शहरात सुरु झाली आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख