ovesi | Sarkarnama

असुद्दिन ओवेसींना शिवसेनेकडून मारहाण

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मार्च 2017

नवी दिल्ली : "एमआयएम'चे ज्येष्ठ नेते असुद्दिन ओवेसी यांना शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी(ता.23) संसद भवनात मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नेमकी ही मारहाण का आणि कशासाठी केली हे मात्र तातडीने समजू शकले नाही. दरम्यान, आपणास कोणीही मारहाण केली नसून हा प्रसिद्धीचा स्टंट असल्याचे ओवैसी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. 

काही कामानिमित्त ओवेसी हे आज दिल्लीत होते. ते संसदभवन परिसरात असताना अचानक गोरक्ष खर्जुल या कार्यकर्त्याने त्यांच्या अंगावर धावून मारहाण केल्याचे वृत्त आहे. आपण ओवसी यांच्या कानशिलात लगावल्याच्या दावा खर्जुल यांनी केला आहे. खर्जुल यांने आपणास मारहाण केलीच नाही असे ओवेसी यांचे म्हणणे आहे. मात्र, मी ओवेसी यांना मारहाण केल्याचा दावा खर्जुल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. खर्जुल हे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचे कार्यकर्ते आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख