Overjoyed Congress Worker Died with Hearth Attack | Sarkarnama

तीन राज्यातील यशाच्या अत्यानंदाने काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

तीन राज्यातील निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्याच्या अत्यानंदात काँग्रेसचे पारोळा येथील माजी तालुकाध्यक्ष सुरेश सुखा ठाकरे (वय 72) राहणार वंजारी (ता.पारोळा)यांचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली.

जळगाव : तीन राज्यातील निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्याच्या अत्यानंदात काँग्रेसचे पारोळा येथील माजी तालुकाध्यक्ष सुरेश सुखा ठाकरे (वय 72) राहणार वंजारी (ता.पारोळा)यांचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली.
 
राज्यस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात काँग्रेसचा विजय झाल्याचा निकाल ऐकूण काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश ठाकरे यांना आनंद झाला. त्यातच त्यांना हदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. गेल्या पंचवीस वर्षापासून ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते काँग्रेस निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख