आमच्या लोकांनी खुळ्याप्रमाणे पक्षांतर केले : हसन मुश्रीफ

माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा बॅंकेसंदर्भात दोनवेळा कारवायांच्या नोटीसा दिल्या. त्यातून काय निष्पन्न झाले नाही म्हणून राज्य बॅंकेच्या घोटाळ्यात मला अडकवले. माझ्यामागे प्राप्तीकर विभागाचा ससेमिरा लावला. गोडसाखर चालवायला घेतलेल्या ब्रिस्क कंपनीलाही माझ्यामुळे त्रास दिला. कंपनीवरही छापा टाकला. -हसन मुश्रीफ
HASAN_MUSHRIF_CHANDRAKANT_PATIL
HASAN_MUSHRIF_CHANDRAKANT_PATIL

गडहिंग्लज  : निवडणुकीपूर्वी वातावरण वेगळे होते. आमचे किती आमदार निवडून येणार, सत्तेपर्यंत पोहोचू की नाही याची शंका होती. पुन्हा भाजपची सत्ता येण्याची चिन्हे दिसू लागली होती. याच वातावरणात आमचे काही लोक खुळ्याप्रमाणे इकडे-तिकडे गेले.

परंतु निवडणुकीनंतर वेगळेच चित्र तयार झाले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची ही सारी किमया आहे. लोकांना गृहीत धरले तर काय घडू शकते, हे महाराष्ट्राने दाखवून दिले आहे, असे मत आमदार हसन मुश्रीफ यांनी आज व्यक्त केले.

आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभ कार्यक्रमावेळी मुश्रीफ व चंदगडचे आमदार राजेश पाटील यांचा सत्कार झाला. या संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष ऍड. श्रीपतराव शिंदे अध्यक्षस्थानी होते. या वेळी ऍड. शिंदे यांनी विटाळ झालेल्यांना परत पक्षात घेताना तपासून घेण्याची सूचना केली.

मुश्रीफ म्हणाले, "लोकसभा निवडणुकीवेळी दिलेल्या वचनाची शिवसेनेने भाजपला आठवण करून दिली. त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी "ब्र' शब्दही काढला नाही. यावरून भाजपने शब्द दिला हे  शिवसेनेचे म्हणणे खरे असावे असे वाटते. दरम्यान राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेना एकत्र येण्याचा मानस सुरू झाला. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा हे स्वप्न पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. भाजपला सत्तेपासून रोखा अशी राज्यातील जनतेचीही इच्छा आहे. यामुळे निश्‍चित आपले सरकार येणार असून कारखान्यावरील गौळदेवालाही तसे साकडे घातले आहे.


माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा बॅंकेसंदर्भात दोनवेळा कारवायांच्या नोटीसा दिल्या. त्यातून काय निष्पन्न झाले नाही म्हणून राज्य बॅंकेच्या घोटाळ्यात मला अडकवले. माझ्यामागे प्राप्तीकर विभागाचा ससेमिरा लावला. गोडसाखर चालवायला घेतलेल्या ब्रिस्क कंपनीलाही माझ्यामुळे त्रास दिला. कंपनीवरही छापा टाकला. तरीसुद्धा कंपनीने केवळ माझ्या शब्दाखातर तोटा सहन करूनही हा कारखाना अखंडीतपणे चालू ठेवला आहे. अशा पद्धतीने सर्वतोपरी प्रयत्न करूनही माजी पालकमंत्री पाटील यांना यश आले नाही. अखेर जनतेने मला पाचव्यांदा निवडून दिले. भाजपला शेतकरी कळला नाही. समस्या कळल्या नाहीत. बेरोजगारीबाबत राज्यभर संताप आहे. त्याचे पडसाद या निवडणुकीत उमटले.

मुश्रीफ वजनदार नेते
ऍड. शिंदे म्हणाले, "आमदार हसन मुश्रीफ वजनदार नेते आहेत. सत्ता स्थापनेचा घोळ लवकर संपवावा. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पळ काढणारे कोणत्या किमतीचे असतात, हे पहायला मिळाले आहे. यामुळे पक्षात पुन्हा परत येणाऱ्यांना तपासून घ्या. दोन्ही आमदारांचा कारखान्यातर्फे सत्कार केला आहे. आमदार मुश्रीफ यांनी उसाला चांगला दर देवून, तर आमदार राजेश पाटील यांनी चंदगडमधून गडहिग्लज कारखान्याला ऊस पाठवून मदत करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com