...यासाठी लढा सुरू राहील : खासदार सुप्रिया सुळे

आज देशात तसेच राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाला शांततेच्या मार्गाने आपला पक्ष पाठिंबा देईल.आपण सारे भारतीय आहोत अशी केंद्र सरकारची जोपर्यंत भूमिका होत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहील, असा ठाम विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे व्यक्त केला.
Supriya Sule Addressing Party Workers on Republic Day at Mumbai
Supriya Sule Addressing Party Workers on Republic Day at Mumbai

मुंबई : आज देशात तसेच राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाला शांततेच्या मार्गाने आपला पक्ष पाठिंबा देईल.आपण सारे भारतीय आहोत अशी केंद्र सरकारची जोपर्यंत भूमिका होत नाही तोपर्यंत हा लढा  सुरू राहील, असा ठाम विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात भारताचा ७१ वा प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा करण्यात आला. मुंबई प्रदेश कार्यालयात ध्वजारोहण करून खासदार सुळे यांनी सेवा दल व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह झेंड्याला सलामी दिली. त्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना त्या बोलत होत्या.

''आज देशात दुजाभाव निर्माण झालेला असताना प्रजासत्ताक दिवस आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची व आपल्या अधिकाराची आठवण करून देतो. आपल्या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण वर्षभरात संविधानाची अंमलबजावणी करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे," असेही त्या म्हणाल्या.

यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, मुंबई विभाग अल्पसंख्याक अध्यक्ष सोहेल सुभेदार, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, सेवा दल प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, प्रवक्ते संजय तटकरे, महेश चव्हाण, मुंबई विभाग राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेस अध्यक्ष अमोल मातेले तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com