उस्मानाबादेत शेतकरी संपात राष्ट्रवादी, युवासेना उतरली - Osmanabad :NCP and Shivsena youth wing enter in Farmer"s agitation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

उस्मानाबादेत शेतकरी संपात राष्ट्रवादी, युवासेना उतरली

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 जून 2017

युवासेनेचा चक्का जाम

शेतकऱ्यांच्या संपात प्रत्यक्ष सहभागी होत कर्जमुक्तीच्या मागणीसाठी तासभर चक्काजाम आंदोलन करत युवासेनेच्या  कार्यकर्त्यांनी दूध व भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला.

उस्मानाबाद ः पडद्यामागून शेतकरी संपाला आपला पाठिंबा असल्याचे सांगणारे राजकीय पक्ष आता प्रत्यक्षात मैदानात उतरले आहेत. शेतकरी संप मागे घेतल्याच्या घोषणेनंतर आज चौथ्या दिवशी संपाची तीव्रता अधिकच वाढली.

राष्ट्रवादी व शिवसेनेची अंगीकृत शाखा असलेली युवासेना संपाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्या.

उमरगा तालुक्‍यातील मरुम, आलूर व वाशी येथील आठवडी बाजारात शेतकरी आपला माल घेऊन न आल्याने हे बाजार भरलेच नाही. तूळजापूरमध्ये दूध घेऊन
जाणाऱ्या ट्रकवर आंदोलनकर्त्यानी दगडफेक करत तो रोखला.

तर दोन ठिकाणी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. संप सुरु असतांना भाजीपाल
व फळांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या हातगाड्या उलटवण्यात आल्या.अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आठवडी बाजार बंद पाडतआक्रमक आंदोलन केले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख