दहा वर्षांच्या विकासाचा बॅकलॉग आमदार कैलास पाटील भरून काढणार

सरपंच ते आमदार असा प्रवास असलेले कैलास पाटील मतदारसंघातील दहा वर्षाच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी झपाट्याने कामाला लागले आहेत
MLA Kailas Patil with CM Uddhav Thackeray
MLA Kailas Patil with CM Uddhav Thackeray

उस्मानाबाद : गेल्या दोन टर्मपासुन उस्मानाबाद - कळंब मतदारसंघात विरोधी पक्षाचा आमदार असल्याने विकास ऐवजी राजकीय कुरघोडी अधिक पाहयला मिळाल्या. आता मात्र सत्ताधारी पक्षाचा तरुण आमदार मिळाल्याने विकासांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सरपंच ते आमदार असा प्रवास असलेले कैलास पाटील मतदारसंघातील दहा वर्षाच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी झपाट्याने कामाला लागले आहेत.

मंत्र्याच्या भेटीचा धडाकाच त्यांनी लावल्याचे दिसुन येत आहे. शेतकर्‍यांची दुख : जवळुन अनुभवलेले असल्याने आमदार पाटील यांनी  पहिल्याच अधिवेशनात शेतकर्‍यांना विजेच्या समस्येला कस तोंड द्यावे लागते हे निर्दशनास आणून दिले. शेतीपंपाला लागणाऱ्या वीज कनेक्शनसाठी वीज महावितरण कंपनीने पैसे भरून घेणे बंद केले होते. पारंपरिक पद्धतीने नवीन वीज कनेक्शन देने बंद केल्याने  शेतकऱ्यांमधून संपात व्यक्त केला जात होता. कृषी पंपांना कनेक्शन देण्याची मागणी शेतक-यांकडुन केली जात असल्यामुळे आमदार कैलास पाटील यांनी शेतीपंपाला वीज कनेक्शन देण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.

शिवाय नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार  पाटील यांनी शेतीपंपाचे वीज कनेक्शन सुरू करणेबाबतचा औचित्याच्या मुद्दयाद्वारे हा मुद्या मांडला होता. त्याचा परिणाम  13 जानेवारी 2020 पासुन शेतीपंपाचे विज कनेक्शन सुरू करण्यासाठी आॅनलाईन प्रस्ताव सादर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच उस्मानाबादच्या मेडीकल काॅलेजसाठी आमदार पाटील यांनी पाठपुरावा सुरु केला असुन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन याविषयावर बैठक घेण्याचीही मागणी केली आहे. येत्या अधिवेशनात अनेक रखडलेल्या प्रकल्पासाठी बजेटमध्ये तरतुद करण्यासाठी आमदार पाटील जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे.

जिल्हाप्रमुख असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या थेट सबंधाचा फायदा मतदारसंघाला होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गेल्या दहा वर्षाच्या विकासाचा बॅकलाॅग भरुन काढण्याचे मोठं आव्हान आमदार कैलास पाटील यांच्यासमोर असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com