भाजपचा सामना करण्यास विरोधी पक्ष सक्षम नाहीत : मुख्यमंत्री

पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी तयार राहावे. जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी तसेच केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
भाजपचा सामना करण्यास विरोधी पक्ष सक्षम नाहीत : मुख्यमंत्री

नागपूर : भारतीय जनता पक्षाची पाळेमुळे गावागावापर्यंत पोहोचले असून भाजपचा सामना करण्यास विरोधी पक्ष सक्षम नसल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केला.

पूर्व विदर्भ विभागीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे उद्‌घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात झाले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर देशमुख, नागपूर शहर भाजपचे अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. उत्तर प्रदेशमध्ये दोन लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाल्याचा संदर्भ देऊन ते म्हणाले की काही पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाल्याने विरोधक खूप खूष झाले आहेत. काही निवडणुकांमध्ये पराभूत झाल्याने कार्यकर्त्यांना नाराज होऊ नये. भाजपने संपूर्ण देशामध्ये कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केलेले आहे. या कार्यकर्त्यांच्या भरवशावर 2014 मध्ये केंद्र व राज्यात सत्ता संपादन केली. याच कार्यकर्त्यांच्या भरवशावर पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये निश्चितपणे भाजपला विजय मिळेल


भाजपशी दोन हात करण्याची क्षमता व विश्‍वास विरोधी पक्ष गमावून बसला आहे, असे सांगून ते म्हणाले, भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भरवशावरच पुढील वाटचाल केली जाणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी तयार राहावे. जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी तसेच केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com