मोदींच्या आवाहनापासून जनतेला भरकटवण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न  : चंद्रशेखर बावनकुळे

१० मिनीटांत २००० मेगावॅट विज आपण कमीजास्त करु शकतो. एवढी आपली यंत्रणा सक्षम आहे. त्यामुळे उद्या रात्री ९ मिनीटांसाठी विजेचे दिवे बंद केल्याने कुठलाही धोका निर्माण होणार नाही. तरीहा सद्यस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनापासून जनतेला भरकवटण्यासाठी भरकटवण्यासाठी विविध स्तरावरुन प्रयत्न निंदनीय असल्याचे राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
opposition tries to deviate people from modi appeal says chandrashekhar bavankule
opposition tries to deviate people from modi appeal says chandrashekhar bavankule

नागपूर ः १० मिनीटांत २००० मेगावॅट विज आपण कमीजास्त करु शकतो. एवढी आपली यंत्रणा सक्षम आहे. त्यामुळे उद्या रात्री ९ मिनीटांसाठी विजेचे दिवे बंद केल्याने कुठलाही धोका निर्माण होणार नाही. तरीहा सद्यस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनापासून जनतेला भरकवटण्यासाठी भरकटवण्यासाठी  विविध स्तरावरुन प्रयत्न निंदनीय असल्याचे राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

सामान्यपणे एका घरामध्ये जर १०० युनिट विज वापरली जात असेल, तर त्यापैकी १० टक्के वापर हा विजेच्या दिव्यांसाठी होतो. त्यामुळे ९ मिनीटांसाठी घरांतील दिवे बंद केल्याने देशाला धोका होऊ शकतो, असे म्हणणे पोरकटपणाचे वाटते. आपल्या देशाचा इतिहास आहे की, सकाळी ८ वाजता आपण सोलरचे युनिट सुरु करतो. तेव्हा दुपारी १२ वाजेपर्यंत ३० हजार मेगावॅट विज निर्माण होते. हा भार सु्द्धा आपण मॅनेज करतो. तेवढी आपली यंत्रणा सक्षम आहे. आज कोरोनाशी लढा देताना महाराष्ट्र राज्याचा विरोधी पक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत संपूर्ण ताकदीनीशी उभा आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस स्वतः आपल्या सहकाऱ्यांसह दवाखान्यांमध्ये कीट, ह्वेंटीलेटरर्सची उपलब्धता आणि इतर गरजांसाठी पाठपुरावा आणि प्रयत्न करीत आहेत, असे असताना काही मंडळी मात्र जनतेला पंतप्रधानांच्या आवाहनापासून भटकवण्याचे काम का करीत आहे, हे कळत नाही, असा प्रश्न बावनकुळे यांनी केला.

वीज वितरण क्षेत्रातील जागतिक स्तराचे तज्ज्ञ आपल्याकडे आहेत. आपल्या देशात निर्माण होणारी वीज मिनीट टु मिनीट मॅनेज करण्यासाठी लागणारे नॅशनल पाॅवर ग्रिड आपल्याकडे आहेत. त्यामुळे कपोलकल्पीत बातम्या निर्माण करुन जनतेला पंतप्रधानांच्या आवाहनापासून दूर नेण्यासाठी रचलेले हे कारस्थान असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

 
पंतप्रधानांच्या आवाहनाबद्दल बावनकुळे यांनी त्यांचे आभार मानले आहे. कोरोनासारख्या महामारी विरुद्ध लढण्यास आपण 130 कोटी भारतीय एकत्र आहोत. कुणीही एकटे नाही हेच या उपक्रमातून पंतप्रधानांना सांगायचे आहे, असे सांगून बावनकुळे म्हणाले, की संपूर्ण देशाने या आवाहनाचे पालन करावे. वीज यंत्रणेवर ताण येईल असे तांत्रिक प्रश्न निर्माण करण्यात आले. पण देशात यापूर्वी 15 हजार मेगावाट विजेचे बॅकडाऊन झाले आहे. राज्यातही 2500 मेगावाटचे  बॅक डाऊन झाले आहे. पंतप्रधानांनी फक्त 9 मिनिटे लाईट बंद करण्यास सांगितले आहे. विजेची अन्य उपकरणे मात्र सुरू राहणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय ग्रीड वर त्याचा परिणाम होणार नाही.

आपल्या राज्यात कोयनासारखे 9 मिनिटात सुरू व बंद होणारे वीज प्रकल्प आहेत. एस एल डी सी चे व केंद्र सरकारचे तांत्रिक अधिकारी यावर अभ्यास करीत आहे.  राज्याकडे हुशार तांत्रिक अधिकारी आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. पंतप्रधानांनी महामारी विरुद्ध सर्वाना एकत्र लढण्याचे आवाहन केले आहे. तांत्रिक बाबी दाखवून त्यावर फाटे फोडू नयेत, असेही बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com