तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे! 

तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून नागपूर महापालिकेचे राजकारण बदलून गेले आहे. सत्ताधारी पुरते अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे त्यांना चिडवण्याची संधी विरोधक साधत आहेत.
opposition taunting ruling party in nagpur corporation
opposition taunting ruling party in nagpur corporation

नागपूर : आयुक्तांनी विकासकामे रोखल्याने सत्ताधारी बाकावरील नगरसेवक चांगलेच चिडले आहेत. आयुक्तांवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही.

विरोधी पक्षातील नगरसेवक हरीश ग्वालवंशी म्हणाले, आयुक्तांनी सत्ताधाऱ्यांची विकास कामे थांबविली तर त्यांचा तिळपापड झाला. मग या सत्ताधाऱ्यांनी विरोधी नगरसेवकांना विकास कामांसाठी निधी दिला नाही, तेव्हा आम्हाला कसे वाटले असेल? आता "तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे', असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना हाणला.

आयुक्तांनी विकास कामे रोखल्याने आर्थिक स्थितीचा आढावा ठेवण्याबाबत त्यांना निर्देश देण्यात आले होते. आयुक्तांनी आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आकडेवारीसह आर्थिक स्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्ताधारी बाकावरील प्रवीण दटके, संजय बंगाले, दयाशंकर तिवारी यांनी आयुक्तांना संपूर्ण 12 वर्षांच्या आकडेवारीसह निवेदन करण्याचा आग्रह धरला. तोपर्यंत कार्यादेश झालेली कामे सुरू करण्याची विनंती सभागृहाला केली. विकास कामे रोखल्याने सत्ताधारी नगरसेवकांचा संताप बघता विरोधी बाकावरील हरीश ग्वालवंशी यांनी सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेतले. विकास कामे थांबविल्याचा सत्ताधाऱ्यांना आज त्रास होत आहे. मात्र, गेली अनेक वर्षे सत्ताधारी निधी देत नसल्याने हा त्रास विरोधक सहन करत होते. आता सत्ताधाऱ्यांवरच त्रास सहन करण्याची वेळ आली. आता 'तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल, ते ते पहावे', असा टोला त्यांनी हाणला. जोपर्यंत स्वतःवर वेळ येत नाही, तोपर्यंत कळत नाही, असा टोलाही त्यांनी हाणला. कॉंग्रेसचे कमलेश चौधरी यांनी नवीन नगरसेवक तसेच विरोधी नगरसेवकांना किती निधी दिला, याचाही आयुक्तांनी लेखाजोखा मांडावा, अशी मागणी करीत सत्ताधाऱ्यांच्या दुजाभावावर बोट ठेवले.

शहराची स्वच्छता करताना अनेक वर्षांपासून सेवा देत असलेल्या ऐवजदारांना स्थायी करण्याची मागणी बसपाचे जितेंद्र घोडेस्वार यांनी प्रश्‍नोत्तरात केली. आस्थापना खर्चाच्या नावावर त्यांच्यावर अन्याय होऊ नये, अशी मागणी कॉंग्रेसच्या हर्षला साबळे, अपक्ष आभा पांडे यांनी केली. महापौर संदीप जोशी यांनी 1800 ऐवजदारांना स्थायी करण्याचा निर्णय झाला असून प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com