दलित, आदिवासी, मागासवर्गीयांना विरोध भाजपच्या डीएनएमध्येच - खर्गे

दलित, आदिवासी, मागासवर्गीयांना विरोध भाजपच्या डीएनएमध्येच असल्याची टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केली आहे.
oppose to dalit, adiwasi and backward class is in dna of bjp says kharge
oppose to dalit, adiwasi and backward class is in dna of bjp says kharge

पुणे - दलित, आदिवासी, मागासवर्गीयांना विरोध भाजपच्या डीएनएमध्येच असल्याची टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केली आहे. 

सरकारी नोकऱ्यांतील संवैधानिक आरक्षणावर भाजपने हल्ला केला असून, मागासवर्गीयांच्या हितासाठी काँग्रेस कोणतीही लढाई लढण्यास तयार आहे अशी ग्वाही खर्गे यांनी या वेळी दिली.

खर्गे म्हणाले, की भाजपा व संघ परिवार हा सुरुवातीपासूनच आरक्षणविरोधी असून आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत व मनमोहन वैद्य यांनी वारंवार आरक्षणविरोधी वक्तव्ये केलेली आहेत. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून एससी, एसटी सबप्लान संपवण्यासाठी दलित, आदिवासी, मागासवर्गीयांसाठींच्या योजनांच्या निधीत कपात केली आहे. काँग्रेस सरकारने मात्र सबप्लानच्या माध्यमातून लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला होता.

दलित मागासवर्गीयांना नोक-या मिळू नयेत, नोक-यांमधील त्यांचा बॅकलॉग भरू नये. दलित, आदिवासी, मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनांना निधी मिळू नये हीच भाजपाच्या केंद्र सरकारची कार्यपद्धती राहिलेली आहे. मोदी सरकारच्या काळात दलितांवरच्या अत्याचारांत मोठी वाढ झाल्याचेही एनसीआरबीच्याअहवालात स्पष्ट झालेले आहे, असे त्यांनी सांगितले.

भाजपाचे हे सरकार दलित आदिवासी मागावर्गीयांच्या विरोधी असून या समाजाचे शोषण मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. परंतु काँग्रेस पक्ष या समाजाच्या पाठीशी असून त्यांच्यासाठी कोणतीही लढाई लढण्यास तयार आहे, असे त्यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com