' समृद्धी'ला  विरोध करणाऱ्या नेत्याने लावलाय महामार्गा लगत  जमीन खरेदीचा सपाटा

समृद्धी महामार्गालगतच्या जमिनीला खूप महत्व येणार आहे . त्यामुळे अनेकांनी या मार्गालगत जमिनी खरेदीचा सपाट लावला आहे . भविष्यात महामार्गालगतच्या जमिनींना सोन्याचा भाव येणार आहे . तसेच महामार्गात जमीन संपादित झाली तर शासन देखील चांगला मोबदला देणार आहे . त्यामुळे संपादित जमिनीचा मोबदला वाढवून मिळावा यासाठीही काही जण महामार्गाच्या विरोधातील आंदोलन भडकावण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे .
highway-samruddhi
highway-samruddhi

ठाणे  :  मुंबई - नागपूर दरम्यानच्या प्रस्तावित समृध्दी महामार्गाच्या परिसरात सरकारी अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी जमिनी खरेदी केल्याची चर्चा वारंवार झाली आहे.

आता तर या प्रकल्पाच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या शहापूर येथील शेतकऱ्यांचे नेते बबन हरणे यांनीच जमीन खरेदी - विक्री केल्याची तक्रार ठाणे ग्रामीण पोलिसांकडे केली असल्याने खळबळ उडाली आहे.

 सामाजिक कार्यकर्ते अरुण सिंग ही तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. बबन हरणे यांनी खराडे, हेगवली, आणि आसनगाव या भागातील 12 ठिकाणची जमीन काही वर्षांत खरेदी केली आहे.

 रेडी रेकनरनुसार त्याचा दर 86 लाख 28 हजार आहे. मात्र, हरणे यांनी हिच जमीन 61 लाख 82 हजारात खरेदी केल्याची तक्रार आहे. एवढेच नव्हे, तर 2010 ते 2012 दरम्यान रेडी रेकनरनुसार 22 लाखाची जमीन 29 लाख 44 हजारांना विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

भविष्यात समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचा दावा करून त्याविरोधात संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. या संघर्ष समितीमध्ये बबन हरणे हे काम करीत आहेत.

 परंतु गेल्या काही वर्षात हरणे यांनी या परिसरातील जमिनी खरेदी केल्या आहेत, असे सांगून सिंग यांनी तक्रार अर्जासोबत व्यवहाराचा तपशीलवार लेखाजोखा पोलिसांकडे सादर केला आहे. हरणे यांनी गरीब शेतकऱ्यांकडून कमी दरात जमीनी खरेदी केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

हरणे यांचे उत्पन्न आणि त्यांची जमीन खरेदी यांचा मेळ बसत नसल्याने त्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आल्याचे समजते. हरणे यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने झालेल्या जमीन खरेदीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी आहे. याबाबत काही संशयास्पद खरेदी विक्री झाल्याचे पुरावे मिळाल्यास त्या विरोधात योग्य कारवाई करण्यात येणार आहे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत कदम यांनी सांगितले.


  याबाबत हरणे यांनी सांगितले की," मी खरेदी केलेली जमीन प्रस्तावित महामार्गापासून दूर आहे. या प्रकल्पाला विरोध करत असल्याने सरकारकडून बदनाम करण्यात येत आहे. या बाबत माझी बाजू पोलिसांकडे मांडली आहे. " 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com