लवकरच कमळाच्या पाकळ्या गळायला सुरुवात होईल - विजय वडेट्टीवार

वसंत ऋतुची चाहुल लागली आहे आणि पानगळ सुरु झाली आहे. अशात लवकरच कमळाच्या पाकळ्याही गळायला सुरुवात होईल, असे वक्तव्य राज्याचे बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज सकाळी येथे पत्रकारांशी बोलताना केले. त्यांचे ऑपरेशन लोटस कदापिही यशस्वी होणार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.
operation lotus will never successful says vijay wadettiwar
operation lotus will never successful says vijay wadettiwar

नागपूर ः वसंत ऋतुची चाहुल लागली आहे आणि पानगळ सुरु झाली आहे. अशात लवकरच कमळाच्या पाकळ्याही गळायला सुरुवात होईल, असे वक्तव्य राज्याचे बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज सकाळी येथे पत्रकारांशी बोलताना केले. त्यांचे ऑपरेशन लोटस कदापिही यशस्वी होणार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भाजपात गेलेले नेते, आमदार आपआपल्या नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि नेत्यांनीही त्यांच्या परतीचे मार्ग सुकर केले आहेत. ही सर्व मंडळी नेत्यांशी चर्चा करत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच महाराष्ट्राच राजकीय वातावरण बदललेलं असेल. पण नेमक कोण-कोण परतीच्या मार्गावर आहे, त्यांची नावे आता उघड करणे योग्य होणार नाही, असे सांगतानाच ते म्हणाले की, भाजप नेत्यांना देखील चांगल्या पद्धतीने माहीती आहे की महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही. तरीही ते आपल्या कार्यकर्त्यांना आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना भासवण्यासाठी वारंवार तीन महीन्यात सरकार पडेल, सहा महीन्यात पडेल, असे वक्तव्य करीत सुटले आहेत. प्रशासनात काही भाजप धार्जीने अधिकारी आहेत, त्यांचे बळ वाढविण्यासाठी त्यांनी हे प्रकार चालविले असल्याची टिका त्यांनी केली.

विरोधी पक्षात असतानादेखील जनहीताची कामे करता येतात, पण देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्ष नेते नव्हे तर केवळ भाजपचेच नेते असल्यासारखे अद्यापही वागत आहेत व तशी वक्तव्ये करीत आहेत. आपली सत्ता गेली, हे अद्याप त्यांच्या पचनी पडलेले नाही. जनहीताची कामे करण्याचे सोडून ते सत्तेसाठी हपापले आहेत. सत्तेची हाव त्यांना सुटली आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com