कर्जत-जामखेड मधून केवळ पालकमंत्री राम शिंदे यांची मुलाखत

कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रा. राम शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. आज मुलाखतीलाही इतर कुणीही आले नसल्याने त्यांची निर्विवाद उमेदवारी आहे, असे मानले जाते.
Ram Shinde Karjat-Jamkhed
Ram Shinde Karjat-Jamkhed

नगर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज नगरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. या वेळी कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघातून केवळ प्रा. राम शिंदे यांनीच मुलाखत दिली. इतर प्रत्येक मतदारसंघात विद्यमान आमदारांनाही प्रतिस्पर्धी म्हणून इच्छुकांनी मुलाखती दिल्या. एकमेव कर्जत-जामखेड मध्ये मात्र मुलाखतीसाठी कोणताही कार्यकर्ता पुढे आला नाही.

कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रा. राम शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. आज मुलाखतीलाही इतर कुणीही आले नसल्याने त्यांची निर्विवाद उमेदवारी आहे, असे मानले जाते. दरम्यान, या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांची उमेदवारी आघाडीच्यावतीने निश्चित मानली जाते. 

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ही लढत प्रतिष्ठेची केली जाणार आहे. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांची उमेदवारी भाजपच्यावतीने निश्चित मानली जात असल्याने या लढतीकडे राज्याचे लक्ष लागणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com