महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून अजित पवारांना पसंती

`सरकारनामा`च्या पोलवरतब्बलवीस हजार जणांनी आपले मत नोंदविले....
ajit pawar as home minister
ajit pawar as home minister

औरंगाबाद  :राज्याचे गृहमंत्री पद कुणाकडे असावे, या संदर्भात  सरकारनामाने केलेल्या कलपाहणीत अजित पवारांना पसंती असल्याचे दिसून आले आहे.  गृहमंत्री म्हणून आपली पसंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की अजित पवार असा प्रश्न विचारण्यात आला होता. मतनोंदनीच्या कलानुसार 56 टक्के लोकांनी अजित पवार यांच्या नावाला पसंती दिली आहे, तर 44 टक्के लोकांच्या मते गृहमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हेच असावेत असे मत व्यक्त केले आहे.

या पोलसाठी एका दिवसांत 19470 लोकांनी आपले मत नोंदवले. त्यानुसार सर्वाधिक 56 टक्के लोकांनी अजित पवार यांच्या नावाला आपली पसंती दर्शवली. तर 44 टक्के लोकांनी उध्दव ठाकरे हे गृहमंत्री असावेत असे म्हटले आहे.

राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेचे सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ, कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. परंतु अद्याप मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात आले नाही.

भाजप सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्री पदाचा पदभार होता. राज्याची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची महत्वाची जबादारी गृहमंत्र्यांच्या खांद्यावर असते त्यामुळे यासाठी स्वतंत्र मंत्री असावा अशी मागणी गेल्या पाच वर्षांपासून केली गेली, मात्र फडणवीस यांनी गृह खाते स्वतः कडेच ठेवले.  

महाआघाडी सरकारमध्ये गृह खाते आणि गृहमंत्री कोण होणार याबद्दल बरीच चर्चा होत आहे. याआधी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात गृहखाते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे होते. जयंत पाटील, आर. आर. पाटील, छगन भुजबळ यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून काम पाहिलेले आहे.

त्यामुळे नव्या सरकारमध्ये गृहमंत्रीपद आपल्याला मिळावे यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील असल्याचे बोलले जाते. पक्षविरुद्ध बंड पुकारत पुन्हा स्वगृही परतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा अद्याप मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे गृह खाते राष्ट्रवादी त्यांच्यासाठी मागून घेणार अशी देखील चर्चा आहे.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री  ठाकरे हे फडणवीस यांचाच कित्ता गिरवत गृह खाते आपल्या कडेच ठेवतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com