येवल्यातील कांदा व्यापारी भागवताहेत २५० जणांची भूक 

कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटात अनेक सामाजिक हातही पुढे सरसावत आहेत. येथील कांदा व्यापारी असोसिएशन, माणुसकी फाउंडेशन तसेच सोशल मीडिया फोरम यांच्या माध्यमातून रोज २५० भुकेलेल्यांची जेवणाची सोय करण्यात आली आहे
Nashik Onion Traders giving food to Needy
Nashik Onion Traders giving food to Needy

येवला : कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटात  अनेक सामाजिक हातही पुढे सरसावत आहेत. येथील कांदा व्यापारी असोसिएशन, माणुसकी फाउंडेशन तसेच सोशल मीडिया फोरम यांच्या माध्यमातून रोज २५० भुकेलेल्यांची जेवणाची सोय करण्यात आली आहे. यामुळे झोपडीतील गरीबांपासून तर वाटसरू, भिकाऱ्यांसह आडोशाला बसलेल्या अनेक गरजूंच्या पोटाची खळगी भरणार आहे. 

कोरोनामुळे हातचे काम हिसकावले असुन घरात बसून राहण्याची वेळ येत असल्याने शहरातील भटक्या व गोरगरिबासह पायी घरी निघालेल्यांची खाण्यापिण्याचे हाल होत आहे.याबाबत तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कांदा व्यापारी असोसिएशन,माणूसकी फाऊंडेशनने रोज जेवणाचे २५० पाकिटे देण्याची तर सोशल मीडिया फोरमने वाटपाची तयारी दर्शवली व दोन दिवसांपासून याला सुरुवात देखील केली आहे. 

कांदा व्यापारी असोसिएशनने संपुर्ण खर्च उचलला असून यासाठी एका आचार्याला शिजवण्याची जवाबदारी दिली आहे.तयार अन्नाचे पाकिटे माणूसकी फाऊंडेशन व सोशल मिडीया फोरमचे कार्यकर्ते वितरीत करत आहेत. सुमारे दीड ते दोन महिने हा उपक्रम सातत्याने चालवण्याचे नियोजन केले गेले आहे. मास्क,हॅन्डग्लोज घालून पुर्ण सुरक्षेने फोरमचे राहुल लोणारी, किरणसिंग परदेशी, योगेश सोनवणे, सचिन सोनवणे, सुभाष गांगुर्डे, तरंग गुजराथी, भूषण शिनकर, अक्षय तांदळे आदी कार्यकर्ते अन्न पाकीट वितरणासाठी सामाजिक बांधिलकीतून मेहनत घेत आहेत. 

कांदा व्यापारी असोसिएशनचे नंदूशेठ अट्टल, भरत समदडीया आणि सर्व सदस्य व पदाधिकारी,माणूसकी फाऊंडेशनचे अल्केश कासलीवाल,सोशल मिडिया फोरमचे समन्वयक बंडू शिंदे आदी या उपक्रमाचे नियोजन करीत आहे.या तिघांच्या समन्वयातून गरजूंना अडचणीत जेवण मिळू लागल्याने त्याचे समाधान या गरिबांच्या चेहऱ्यावर दिसले.

गरजूला दिली चप्पल..

येथील किरणसिंग परदेशी यांची मदतीची तळमळ वाखाणण्याजोगी आहे. स्वतची अपे रिक्षा ते पाकिटे वाटपासाठी वापरत आहेत.आज पायी जाणाऱ्या एकाच्या पायात चप्पल नसल्याने भर उन्हात होणार्या वेदना त्यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतची चप्पल काढून त्यांना दिली. तर एकाला प्यायला पाणी नसल्याने दोन किलोमीटर जाऊन त्यांनी पाणी आणून दिले. विशेष म्हणजे पहिल्या दिवसांपासून ते मदतीत सक्रीय आहे.

या अडचणीच्या काळात ज्यांच्या जेवणाची अडचण आहे,त्यांच्यासाठी कांदा व्यापारी असोसिएशन, माणूसकी फाउंडेशनने व सोशल मिडिया फोरमने हा उपक्रम हाती घेतला आहे. अडचणीची परिस्थिती आहे,तोपर्यत उपक्रम राबविण्याची तयारी आहे. उद्यापासून जेवणाची पाकीटे वाढवून ३५० पर्यत करणार आहोत - आल्केश कासलीवाल,माणुसकी फौंडेशन
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com