onion prize raj thackray nashik | Sarkarnama

मंत्र्यांना कांदे फेकून मारा, राज ठाकरेंचे शेतकऱ्यांना आवाहन 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 डिसेंबर 2018

कळवण (नाशिक) ः शेतकरी त्रस्त असताना सरकार जबाबदारी कसे काय झटकेत असा सवाल करून जेव्हा मंत्री येतील तेव्हा त्यांना कांदे फेकून मारा. जर ते बेशुद्ध पडले तर तोच कांदा त्यांच्या नाकाला लावा असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे केले. 

कळवण (नाशिक) ः शेतकरी त्रस्त असताना सरकार जबाबदारी कसे काय झटकेत असा सवाल करून जेव्हा मंत्री येतील तेव्हा त्यांना कांदे फेकून मारा. जर ते बेशुद्ध पडले तर तोच कांदा त्यांच्या नाकाला लावा असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे केले. 

ठाकरे यांनी आज नाशिकच्या कांदा उत्पादक परिसराचा दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांनी कांदा दर कोसळल्याच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर संतप्त झालेल्या राज यांनी शेतकऱ्यांना सांगितले, की मंत्री आले की त्यांना कांदे फेकून मारा. राज यांच्या आवाहनावर उपस्थितीतांनी टाळ्यांच्या गरजात त्यांने स्वागत केले. 

कळवण चौफुली येथे जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे फटाक्‍यांची आतषबाजीत करीत स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी ठाकरे यांना तलवार भेट दिली. त्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ठाकरे यांची भेट घेतली. 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, की जर कांद्याला भाव मिळत नसेल तर भाजपच्या मंत्र्यांना कांदे फेकून मारा त्यात ते बेशुद्ध पडले तर मारलेलेच कांदे उचलून त्यांच्या नाकाला सुंघवा आणि शुध्दीवर आणा. 

जिल्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे काय बोलतात याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते. अपेक्षेप्रमाणे ाकरे यांनी शेतकरी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्याशी चर्चा केली. 

यावेळी शेतकऱ्यांनी कांद्याच्या घसरलेल्या भावाबद्दल नाराजी व्यक्त केली असता राज ठाकरे यांनी त्यांना सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याचे आवाहन केले. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, उद्योगपती बेबीलाल संचेती, डॉ. प्रदीप पवार, माजी महापौर अशोक मुर्तडक, राहुल ढिकले आदी उपस्थित होते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख