onion bachu kadu will do agitation in chandwad | Sarkarnama

कांदाप्रश्‍नी बच्चू कडूंचा 26 डिसेंबरला मुक्काम मोर्चा, प्रशासन धास्तावले 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

नाशिक ः प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू आता कांदा उत्पादकांच्या प्रश्‍नात लक्ष घोलणार आहेत. कांदा योग्य दराने विकला जावा यासाठी येत्या 26 डिसेंबरला ते चांदवड येथे मुक्काम मोर्चा काढणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे. 

कांदा दर सतत कोसळत आहेत. सत्ताधारी भाजपसह बाजार समितीचे भाजपचे पदाधिकारी थेट पंतप्रधानांना साकडे घालुन परतले मात्र त्यात काहीही बदल झालेला नाही. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारवर कांदा उत्पादक शेतकरी नाराज आहेत.कांदा प्रश्‍नावर खुद्द कडूंनी लक्ष घातल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्‍यता आहे. 

चांदवड येथे 26 डिसेंबरला कांदाप्रश्‍नावर आणि शेतकऱ्यांच्या इतर समस्यांवर प्रहार जनशक्ती पक्षातर्फे प्रांताधिकारी कार्यालयावर मुक्काम मोर्चा काढण्यात येईल. या मोर्चाचे नेतृत्व कडू करणार आहेत. " जिल्ह्यातील शेतकरी, भूमिपुत्र, प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या हक्काच्या लढाईत सहभागी होणार असल्याने येथील प्रशासन धास्तावले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख