`या` मतदारसंघातील शिवसेनेचा उमेदवार `गायब` : प्रचाराचा नारळच फोडला नाही

`या` मतदारसंघातील शिवसेनेचा उमेदवार `गायब` : प्रचाराचा नारळच फोडला नाही

लातूर : राज्यातील लक्षवेधी मतदारसंघापैकी एक म्हणून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. पण येथील लढत आता वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे.

या मतदारसंघातून दिवंगत काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे धाकटे चिरंजीव निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र मूळ भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ अचानक शिवसेनेकडे आला. शिवसेनेने नवख्या सचिन देशमुख यांना पक्ष प्रवेश आणि निवडणुकीचे तिकीटही दिलं.

शिवसेनेने मागणी न करताही हा मतदारसंघ अचानक शिवसेनेला सोडण्यात आला. कारण औसा हा शिवसेनेचा मतदारसंघ भाजपकडे गेल्यामुळे ही आदला-बदल झाली खरी. पण यामुळे धीरज देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाल्याचेच चित्र आहे. कारण लातूर ग्रामीण मध्ये शिवसेनेच्या सचिन देशमुख हे कुठेच प्रचारात दिसत नाहीत. इतकंच काय अद्याप त्यांनी प्रचाराचा नारळही फोडलेला नाही.

त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार दाखवा हजार रुपये मिळावा अशी चर्चा लातूर ग्रामीण मधील नागरिक करीत आहेत. लातूर ग्रामीण मध्ये देशमुख विरुद्ध देशमुख चुरशीची लढत होईल असे वाटत होते. मात्र शिवसेनेच्या सचिन देशमुख यांच्या  भूमिकेमुळे स्वतः शिवसैनिकच संभ्रमात पडले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com