नाशिकमध्ये आढळला कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण, प्रशासन झाले सतर्क

राज्यात 'कोरोना'चा संसर्ग वाढत असल्याच्या बातम्यांच्या पार्श्‍वभूमीवर आज नाशिकमध्ये एकाचा अहवाल पॉझीटिव्ह आला आहे. त्यामुळे ही संख्या दोन झाली असून एवढे दिवस स्थिती नियंत्रण ठेवलेले प्रशासन सतर्क झाले आहे
One More tested positive in Nashik for Corona
One More tested positive in Nashik for Corona

नाशिक : राज्यात 'कोरोना'चा संसर्ग वाढत असल्याच्या बातम्यांच्या पार्श्‍वभूमीवर आज नाशिकमध्ये एकाचा अहवाल पॉझीटिव्ह आला आहे. त्यामुळे ही संख्या दोन झाली असून एवढे दिवस स्थिती नियंत्रण ठेवलेले प्रशासन सतर्क झाले आहे.

दरम्यान जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नागरीकांनी सतर्क रहावे, संचारबंदी, होम क्वारंटाईनचे पालन करावे आणि उत्तर भारत, दिल्ली भागातून प्रवास करुन आलेल्या नागीरकांनी उस्फूर्तपणे आपली तपासणी करावी. रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. नाशिकमध्ये आज बावीस जणांच्या घशातील स्त्रावाच्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये एकाचा अहवाल पॉझीटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सुचना केल्या आहेत. संबंधीत यंत्रणांना आवश्‍यक सुचना देण्यात आल्या आहेत.

५५ जणांचे अहवाल प्रलंबित

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाग्रस्त देशातुन 866 नागरीक दाखल झाले आहेत. 'कोरोना' संसर्गाशी संबंधीत 451 जणांचे 14 दिवसांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. तसेच रविवारी 360 जणांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. काल नवीन आठ संशयीत दाखल झाले होते. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत सर्व्हेक्षणासाठी 221 जणांच्या घशातीस स्त्रावाचे नमुने तपासणीस पाठविले होते. त्यातील 173 जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.

त्यामुळे दाखल असलेल्या 47 आणि काल दाखल झालेल्या 8 अशा 55 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयात 12, मालेगावच्या रुग्णालयात 6, महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात 7 जणांना दाखल केले आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने स्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी गंभीर पावले टाकली आहेत.

तबलीगींंना समोर येण्याचे आवाहन

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सोशल मिडीयाद्वारे आवाहन केले आहे. नुकत्याच दिल्लीत झालेल्या तबलीगी मरकजला उपस्थित राहिलेले नागरीक मोठ्या प्रमाणावर 'कोरोना' बाधीत झाल्याचे आढळले आहे. यातील सात जण नाशिकला दाखल झाले आहेत.तर एकाची अद्याप ओळख स्पष्ट झालेले नाही. त्या अनुषंगाने राज्यभर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

या पार्श्‍वभूमीवर कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संबंधीतांनी स्वतःहून आपली नावे जाहिर करावीत. याअनुषंगाने डॉ. रवींद्र शिंदे यांची त्यासाठी नियुक्ती केली आहे. डॉ. शिंदे पुढील वैद्यकीय सुविधा व उपचारासाठी मदत करतील. मात्र स्वतःहून नावे जाहीर न केल्यास प्रशासनाच्या मोहिमेनंतर उघड झालेल्या अशा तबलीगी नागरीकांवर गंभीर कारवाई केली जाईल. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com