अजित पवार म्हणाले....राष्ट्रवादीला मिळू शकते आणखी एक खाते

मंत्रीमंडळ विस्तारात अजित पवार यांना स्थान मिळणे अपेक्षित होते. मात्र, त्यांचा समावेश झाला नाही. नागपूर अधिवेशनानंतर पवार यांचा समावेश होणार असून उपमुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पवार यांना गृहमंत्रीपद हवे होते. मात्र, सध्यातरी ते खाते शिवसेनेकडे गेले आहे.
One More Portfolio Likely for NCP Say Sharad Pawar
One More Portfolio Likely for NCP Say Sharad Pawar

पुणे : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दहा आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे तीन आमदारांमागे एक मंत्रीपद या सूत्राप्रमाणे राष्ट्रवादीला जिल्ह्यात तीन मंत्रीपदे मिळायला हवीत, अशी अपेक्षा पक्षाचे नेते अजित पवार यांनी आज पुण्यात व्यक्त केली. महाराष्ट्र विकास आघाडीचे खातेवाटप झाले असले तरी राष्ट्रवादीच्या वाट्याला आणखी एक मंत्रीपद मिळू शकते, असे संकेत पवार यांनी दिले.

मंत्रीमंडळ विस्तारात अजित पवार यांना स्थान मिळणे अपेक्षित होते. मात्र, त्यांचा समावेश झाला नाही. नागपूर अधिवेशनानंतर पवार यांचा समावेश होणार असून उपमुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पवार यांना गृहमंत्रीपद हवे होते. मात्र, सध्यातरी ते खाते शिवसेनेकडे गेले आहे.

नागपूर अधिवेशनानंतर मंत्रीमंडळा विस्तारात गृह खाते पुन्हा अजित पवार यांच्याकडे देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्ममंत्रीपदाबरोबरच अजित पवार यांचा गृह खात्याचा आग्रह असल्याचे सांगण्यात येत आहे. पवार यांचा हा आग्रह पक्षाकडून खरोखरच पूर्ण करण्यात येतो का हे नागपूर अधिवेशनानंतर स्पष्ट होईल.

अजित पवार यांनी आज पुण्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना ग्रामपंचावत निवडणुकांची पद्धती, नगरपालिका तसेच महानगरपालिकांच्या सध्याच्या प्रभागपद्धतीबाबत भाष्य केले. त्यांनी आज मांडलेल्या भूमिकेप्रमाणे विचार केला तर सध्याच्या थेट सरपंच व नगराध्यक्ष निवडणूक तसेच महापालिकांमधील प्रभागपद्धतीबाबत नव्या सरकारकडून फेरविचार होऊ शकतो.

खाते वाटपात सहकार व पणन ही खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहेत. त्यामुळे बाजार समित्याबाबत अनेक नवे बदल करणे शक्‍य असल्याचे पवार यांनी सांगितले. सहकारी कारखानदारीच्या धोरणाबाबतही सरकार काही बदल करण्याची शक्‍यता आता निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com