पुण्यात कोरोना बळींची संख्या दोनवर : तीन वर्षांच्या मुलीलाही लागण

दिल्लीतील निजामुद्दीन भागात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात पिंपरी-चिंचवडमधील 23 नागरिक सहभागी झाले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या पाच जणांसह 28 जणांच्या घशातील द्रवाचे नमुने बुधवारी (ता. 1) एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
corona 11
corona 11

पुणे : पुण्यात तीन वर्षांच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. तिच्या आजोबांना कोरोनाची लागण झाल्याने ते मंगळवारी (ता.३१) डाॅ. नायडूत दखल झाले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातली तीन वर्षांच्या बाळाचा अहवाल पाॅझिटिवह आला आहे.

पुण्यात कोरोनाचा दुसरा बळी

पुण्यात कोरोनाच्या दुसऱ्या रुग्णाचा गुरुवारी (ता. 2) मृत्यू झाला. तर, दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमात सहप्रवासी असलेल्यांपैकी दोन जणांसह सात रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. त्यामुळे पुण्यातील रुग्णांची संख्या 46 झाली. त्यापैकी बऱ्या झालेल्या आठ रुग्णांना घरी सोडण्यात आले.

पुण्यातील रविवार पेठेत राहणाऱ्या 50 वर्षांच्या महिलेचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांना श्‍वसनाचा त्रास होता. फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होत गेली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. शहरात एका दिवसात सात नवीन रुग्णांची भर पडली. शहरात सध्या 39 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, ग्रामीण भागात ही संख्या सातपर्यंत वाढली. आतापर्यंत एक हजार 67 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 988 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला. तर, 33 अहवाल प्रलंबित आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या आठ रुग्णांना रुग्णालयातील विलगीकरण कक्षातून घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, दिल्लीतील तबलिगी जमात या धार्मिक कार्यक्रमात गेलेल्या पुण्यातील 46 पैकी 42 जणांच्या तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून, उर्वरित चौघांचा अहवाल मिळालेला नाही. या सगळ्यांना 14 दिवस होम क्वारंटाइनचा सल्ला दिला असून, त्यानुसार या लोकांवर नजर ठेवण्यात येणार आहे. दिल्लीतील निझामुद्दीन येथील कार्यक्रमात महाराष्ट्रातील 115 जणांचा समावेश होता. या सर्वांची दुसरी तपासणी केली जाणार आहे. तोपर्यंत त्यांना महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याचेही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पिंपरीत निजामुद्दीनला गेलेले दोघे पॉझिटिव्ह

दिल्लीतील निजामुद्दीन भागात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात पिंपरी-चिंचवडमधील 23 नागरिक सहभागी झाले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या पाच जणांसह 28 जणांच्या घशातील द्रवाचे नमुने बुधवारी (ता. 1) एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. अन्य 26 जणांना 14 दिवस होम क्‍वारंटाइनची सूचना महापालिका प्रशासनाने केली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील 12 जण पॉझिटिव्ह आढळले होते. 20 मार्च ते एक एप्रिल या 13 दिवसांत एकही पॉझिटिव्ह व्यक्ती शहरात आढळली नव्हती. त्यातील बरे झालेल्या दहा जणांना घरी सोडले आहे. केवळ दोनच व्यक्तींवर उपचार सुरू होते. मात्र, दिल्लीहून आलेल्या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उपचार सुरू असलेल्यांची संख्या चार झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com