पुण्यातील `भोळ्या` आमदाराने हिशोब मागायला केली सुरवात

भाजप नेते हिशोबाला पक्के!
पुण्यातील `भोळ्या` आमदाराने हिशोब मागायला केली सुरवात

पुणे : विधानसभा निवडणूक आणि राजकीय धामधूम संपल्यानंतर पुणे शहरातील एका विजयी उमेदवाराने नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडे हिशेब मागायला सुरुवात केल्याचे समजते. उमेदवारी मिळविण्यापासून ते विजयापर्यंत कायमच चर्चेत राहिलेल्या या उमेदवाराने हिशेबाचा ताळमेळ घालायला सुरुवात केल्याने पक्षात हा चर्चेचा विषय झाला आहे.

सोशल मीडियातही हा उमेदवार चर्चेत होता. निवडणुकीत विजयासाठी आणि विजयानंतरदेखील या उमेदवाराने केलेल्या गमती-जमती आजदेखील शहरात चर्चेचा विषय बनून राहिल्या आहेत. असे असताना आता या उमेदवाराने निवडणुकीत प्रचारादरम्यान केलेल्या वाटपाचा हिशेब नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडे मागण्यास सुरुवात केल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

मताधिक्‍य कमी कसे झाले, हे कारण हिशेब मागण्यामागे असल्याचे पक्षातील सांगण्यात आले. त्यामुळे प्रचाराच्या गडबडीत ही लांडी-लबाडी करून या "भोळ्या' उमेदवाराला अप्रत्यक्ष त्रास देणाऱ्यांना या शोध मोहिमेमुळे घाम फुटला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com