महाराष्ट्राशी संबंधित एकच आयपीएस अधिकारी जिंकले....दोघांचा पराभव

महाराष्ट्राशी संबंधित एकच आयपीएस अधिकारी जिंकले....दोघांचा पराभव

पुणे : मुंबईचे दोन माजी पोलिस आयुक्त या वेळी लोकभेच्या रिंगणात होते. त्यातील फक्त एकालाच विजय मिळू शकला. महाराष्ट्रातील तिसरे पोलिस अधिकारी तर या निवडणुकीत थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

मुंबई पोलिस दलाचे नेतृत्त्व करणारे सत्यपालसिंह आणि अरुण पटनायक हे दोघे आपले राजकीय करीअर घडविण्यासाठी या वेळी रिंगणात उतरले होते. सत्यपालसिंह हे उत्तर प्रदेशीमधील बागपतमधून 2014 च्याही निवडणुकीत मुंबई आयुक्तपदाची राजीनामा देऊन राजकारणात उतरले आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले होते. त्यांनी केंद्रात राज्यमंत्रिपदही घेतले. जाट मतदारांचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या या मतदारसंघातून त्यांनी गेल्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकदलचे प्रमुख अजितसिंह यांचा पराभव केला होता. या वेळी त्यांनी अजितसिंह यांचे पुत्र जयंत चौधरी यांना पराभूत केले. सत्यपालसिंह यांना पाच लाख 25 हजार 789 मते मिळाली. चौधरी यांना पाच लाख दोन हजार 287 मते मिळाली. तेवीस हजार मतांच्या फरकाने सत्यपालसिंह विजयी झाले.

अरुण पटनायक यांना मात्र पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले नाही. बिजू जनता दलाकडून ओरिसातील भुवनेश्वर येथून निवडणूक लढवत असलेल्या पटनायकांचा सामना हा माजी आयएएस अधिकारी अपराजिता संरगी यांच्याशी झाला. राज्यातील लक्षवेधी लढतीत या मतदारसंघाचा समावेश होता. सरंगी यांना चार लाख 86 हजार 991 आणि पटनायक यांना चार लाख 63 हजार 152 मते मिळाली.

महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात गाजलेले अधिकारी व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात येण्याचे धाडस केले. त्यांनी तेलुगू अभिनेता पवनकल्याण याच्या प्रजाराज्यम या पक्षाकडून विशाखापट्टणम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. मात्र त्यांना तिसऱ्या क्रमांकावर राहावे लागले. तेथे वायएसआर काॅंग्रेसचे सत्यनारायण विजयी झाले. त्यांनी चार लाख 36 हाजार 906 मते मिळाली. तेलुगू देसमचे भारत मुथुकुमली यांना चार लाख 32 492 आणि लक्ष्मीनारायण यांना दोन लाख 88 हजार 874 मते मिळाली. पक्षाचे अध्यक्ष  पवनकल्याण यांचा दोन विधानसभा मतदारसंघात पराभव झाला. त्यांनी बसपसोबत युती केली होती.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com