One group in Shivsena lobbying for leaving power | Sarkarnama

शिवसेनेत सत्तेतून बाहेर पडण्याची भाषा करणारा गट पुन्हा  सक्रीय ?

मृणालिनी नानिवडेकर
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

.

मुंबई:   मोदी लाट ओसरली असल्यानचे विधानसभा निवडणूक निकालांनी स्पष्ट केले असल्याने आता सत्तेतून बाहेर पडण्याचा विचार व्हावा अशी भूमिका शिवसेनेतून मांडली जाते आहे. भाजपला सोडले तर आपल्या किती जागा निवडून येतील याचा विचार करणे सध्या सुरू आहे. 

 नाराजीचा फटका आपल्यालाही बसणार असल्याने समवेत रहाण्यातच फायदा असल्याचे मतही दुसऱ्या गटाने मांडले आहे.भाजप सध्या अडचणीत असल्याने अधिक पदरी पाडून घेण्याची ही वेळ असल्याचे शिवसेनेतील बहुतांश मंडळींचे मत आहे. 

मध्यप्रदेश ,राजस्थानच्या तसेच तेलंगणाच्या निकालांचे वस्तुनिष्ठ विश्‍लेषण केल्यानंतरच योग्य त्या निर्णयापर्यंत येणे योग्य ठरेल असे सेनेतील काही ज्येष्ठांचे मत आहे.शिवसेनेचे पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांची निकालानंतरची पहिली प्रतिक्रिया भाजपच्या विरोधात जाणारी आहे.

सरकारमध्ये सामील होवू नये असे उदधव ठाकरे यांचे मत होते ,मात्र सहकाऱ्यांनी सातत्याने धरलेल्या आग्रहामुळे शिवसेना सत्तेत गेली,आता स्वतंत्र अस्तित्व राखायचे असेल तर योग्य तो निर्णय घ्यावा असे सांगितले जाते आहे. येते पंधरा दिवस सेनेच्या विचारमंथनात महत्वाचे असतील असे एका माहितगाराने सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख